Top Newsराजकारण

उद्धव ठाकरे आणि सोनिया गांधींची ‘फोन पे चर्चा’ !

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यामध्ये फोनवर चर्चा झाली असल्याचे समजते आहेत. एकूणच राज्यातील परिस्थिती आणि निधीवाटपाबाबत दोन्ही नेत्यामध्ये चर्चा झाली असल्याची माहिती खात्रीलायकरित्या समजते आहे.

राज्यातील आगामी अर्थसंकल्प अधिवेशन, विधानसभा अध्यक्षांची निवड आणि महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा झाली असल्याची शक्यता आहे. तसेच काँग्रेस नेत्यांना निधी मिळण्याबाबत असलेल्या नाराजीबाबत चर्चा झाली आहे. दरम्यान या दोन नेत्यांमधी काय चर्चा झाली याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर भाजप नेत्यांवर वारंवार भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. केंद्रीय तपाय यंत्रणांचा वापर करुन भाजप महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. असून महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांना ईडीद्वारे निशाणा करण्यात येत आहे. राज्य सरकारमधील काँग्रेसच्या आमदारांना निधी मिळण्याबाबत कुरघोडी होत आहेत. तसेच ऊर्जा विभागात येत असलेल्या अडचणींबाबत काँग्रेसच्या मंत्र्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. नाना पटोले यांच्या नेतृत्वात काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच या भेटीमध्ये निधी वाटपावरुन अर्थमंत्री अजित पवार यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली होती.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. निधी वाटपामध्ये इतर आमदारांच्या तुलनेत काँग्रेसच्या आमदारांवर अन्याय होत असल्याची भावना काँग्रेसकडून व्यक्त करण्यात येत आहे. महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या विकासासाठी समान निधी वाटप होणे गरजेचे आहे. असे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button