कोरोनावरील लसीकरणाच्या अफवांना बळी पडू नका; मोदींची ‘मन की बात’

नवी दिल्लीः पंतप्रधान मोदींनी ‘मन की बात’मधून आज जनतेशी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान मोदींनी धावपटू मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त करत त्यांना आदरांजली वाहिली. यासोबत पंतप्रधान मोदींनी करोनावरील लसीची भीती दूर केली आणि नागरिकांना लस घेण्याचं आवाहन केलं. पंतप्रधान मोदींनी आज मन की बातच्या ७८ व्या कार्यक्रमातून नागरिकांशी संवाद साधला. दरम्यान, मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमाच्या सुरूवातीस, देशवासीयांना उद्देशून ऑलिम्पिकशी संबंधित काही प्रश्न विचारले, तसेच भारताचे दिवंगत महान धावपटू मिल्खा सिंग यांच्या आठवणींना उजाळा दिला.
मध्य प्रदेशातील एका ग्रामस्थ राजेश हिरावे यांनी लसीकरणाबाबत पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला. व्हॉट्सअॅपवर आलेल्या मेसेजमुळे आपण घाबरलो आणि लस घेतली नाही, असं ते म्हणाले. याला उत्तर पंतप्रधान मोदींनी नागरिकांमधील लसीची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. पंतप्रधान मोदींनी आपला आणि आपल्या आईच्या अनुभव सांगितला. मी आणि माझ्या आईनेही करोनावरील लस घेतली आहे. यामुळे घाबरू नका, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
PM @narendramodi begins #MannKiBaat June 2021 with a few questions. Hear LIVE. https://t.co/bmm838DK8Y
— PMO India (@PMOIndia) June 27, 2021
नागरिकांमध्ये गैरसज आणि अफवा पसरवू नका. मी आणि माझ्या आईनेही करोनावरील लस घेतली आहे. यामुळे तुमच्या गावात ज्या काही अफवा पसरल्या आहेत त्यात कुठलेही तथ्य नाही. आपल्या देशातील २० कोटींहून अधिक नागरिकांनी करोनावरील लसीचे डोस घेतले आहेत. यामुळे लसीबाबत गैरसमज करू नका. तुम्हीही लस टोचून घ्या. आणि इतरांनाही लस घेण्यासाठी प्रेरित करा, असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं. आपल्याला लसीकरणचा वेग वाढवायचा आहे. अफवांना बळी पडू नका, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
When talking about the Olympics, how can we not remember Milkha Singh Ji. When he was hospitalised, I got a chance to speak to him, I had requested him to motivate the athletes going for Tokyo Olympics: PM Modi during #MannKiBaat pic.twitter.com/xF3YYDi2uc
— ANI (@ANI) June 27, 2021
Neha Goyal, member of India's Women's Hockey team. Her mother & sisters work at cycle manufacturing to run the family. Dipika Kumari's journey has also been full of ups & downs. Dipika is the only woman archer to represent India at Tokyo Olympics: PM Modi pic.twitter.com/Uv0Bsj3c06
— ANI (@ANI) June 27, 2021
करोनावरील लस घेण्यासाठी आपल्या देशाच्या शास्त्रज्ञांनी मोठे प्रयत्न केले आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवा. करोनावरील लस किती प्रभावी? हे नागरिकांना समजवा. अफवांवर विश्वास ठेवू नका. नागरिकांना लस घेण्यासाठी प्रेरित करा आणि लस घेतल्याने काहीही वाईट होत नाही. करोनाविरोधात लढण्याची प्रतिकारशक्ती वाढते, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध धावपटू मिल्खा सिंग यांचे निधन झाले. मिल्खा सिंग हॉस्पिटलमध्ये त्यावेळी आपण त्यांच्याशी बोललो. तुम्ही १९६४ मध्ये टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. यामुळे या ऑलिम्पिकसाठी तुम्हाला आपल्या भारतीय खेळाडूंचे मनोधैर्य वाढवायचे आहे. त्यांना तुम्ही आपल्या संदेशाने प्रेरणा द्या. ते खेळासाठी त्यांनी जीनव वाहिलं आणि ते भावूक होते. आजारी असतानाही त्यांनी लगेच होकार दिला होता. पण दुर्दैवाने त्यांचे निधन झाले, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी त्यांना आदरांजली वाहिली.




