राजकारण

विमा दुरुस्ती विधेयकावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत गोंधळ; विरोधकांनी फाडली विधेयकाची प्रत

नवी दिल्ली:संसदेच्या पावसाळी अधिवेशनात बुधवारी सर्वसाधारण विमा सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान राज्यसभेत बराच गदारोळ झाला. विरोधी पक्षाच्या काही खासदारांनी विधेयकाची प्रत फाडून खुर्चीवर फेकली. यामुळे कामकाजात कही काळ व्यत्यय आला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हे विधेयक सभागृहात मांडले होते.

यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे खासदार मनोज झा म्हणाले की, विमा विधेयक कसे आणले जात आहे याकडे संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तर, खासदार सुखेंदू शेखर रे यांनी विमा दुरुस्ती विधेयकाला विरोध असल्याचे म्हटले. त्याआधी तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेके ओब्रायन म्हणाले होते की, मोदी-शहा यांचे गुजरात मॉडेल आता दिल्लीतही आणले जात आहे. केंद्र सरकारला विमा विधेयक पास करुन घ्यायचे आहे, त्यामुळे संसदेत सध्या खासदारांपेक्षा जास्त सुरक्षा रक्षक आहेत. पण राज्यसभा टीव्ही हे जनतेला दाखवणार नाही.

दरम्यान, या आधी लोकसभेनंतर राज्यसभेतही १२७ व्या घटना सुधारणा विधेयकाला मंजुरी देण्यात आली आहे. या विधेयका अंतर्गत आता राज्यांना इतर मागासवर्गीयांची (ओबीसी) यादी तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. सर्व पक्षांनी या विधेयकाला पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसभेत यापूर्वीच या विधेयकाला मंजुरी मिळाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button