Top Newsस्पोर्ट्स

जोकोव्हिचला फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद

पॅरिस : सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने आज दुसऱ्यांदा फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. जोकोव्हिचला अंतिम फेरीत ग्रीसच्या स्टेफीनोस स्तिस्तिपासने चांगलीच लढत दिली. पण जोकोव्हिचने यावेळी अंतिम फेरीत स्टेफीनोस स्तिस्तिपासला ६-७, २-६, ६-३, ६-२, ६-४ असे पराभूत केले आणि जेतेपदाला गवसणी घातली.

अंतिम फेरी ही चांगलीच रंगतदार झाली. कारण पहिल्या सेटमध्ये जोकोव्हिच आणि स्टेफीनोस स्तिस्तिपास यांच्यामध्ये चांगली लढत पाहायला मिळाली. पहिला सेट हा ६-६ अशा बरोबरीत आल्यामुळे टाय ब्रेकर खेळवावा लागला. यावेळी टाय ब्रेकरमध्ये स्तिस्तिपासने जोकोव्हिचवर ८-६ अशी मात केली आणि पहिला सेट जिंकला. हा टेनिस चाहत्यांना सर्वात मोठा धक्का होता. कारण अव्वल टेनिसपटू जोकोव्हिचला फायनच्या पहिल्या सेटमध्ये पराभूत करणे सोपे नसते. पण स्तिस्तिपास फक्त पहिल्या सेटपर्यंतच थांबला नाही. पहिला सेट जिंकल्यावर स्तिस्तिपासचे मनोबल उंचावलेले पाहायला मिळाले कारण दुसऱ्या सेटमध्ये स्तिस्तिपासने अधिक आक्रमक खेळ केला. स्तिस्तिपासने दुसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिचला पुरते हतबल करुन सोडले होते. कारण स्तिस्तिपासने दुसरा सेट ६-२ अशा मोठ्या फरकाने जिंकला. त्यामुळे टेनिस विश्वाला फ्रेंच टेनिस स्पर्धेच्या अंतिम फेरीत दोन जोरदार धक्के बसले होते.

पहिले दोन्ही सेट्स जिंकल्यावर स्तिस्तिपास आता सहज जेतेपद पटकावेल, असे काही जणांना वाटले होते. पण जोकोव्हिचने यावेळी लढाऊ बाणा दाखवला आणि त्याने तिसऱ्या सेटमध्ये दमदार पुनरागमन केले. तिसऱ्या सेटमध्ये जोकोव्हिटने दमदार पुनरागमन केले आणि हा सेट ६-३ असा जिंकला. जोकोव्हिच फक्त यावरच थांबला नाही. त्यानंतर जोकोव्हिचने चौथा सेट ६-२ असा सहजपणे जिंकला आणि सामन्यात २-२ अशी बरोबरी केली. त्यानंतर झालेला तिसरा सेट चांगलाच रंगला. पण सुरुवातीला यामध्ये जोकोव्हिच आघाडीवर होता. पण स्टेफीनोस स्तिस्तिपासने त्याचा चांगली झुंज दिली. पण अखेर जोकोव्हिचने पाचाव सेट ६-४ असा जिंकला आणि जेतेपदाला गवसणी घातली. जोकोव्हिचचे एकूण हे १९ वे ग्रँडस्लॅम जेतेपद ठरले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button