देगलूरमधील शिवसैनिकांमध्ये असंतोष; सुभाष साबणेंसोबत कार्यकर्ता खंबीरपणे उभा
नांदेड : देगलूरचे विद्यमान आमदार काँग्रेसचे नेते आमदार रावसाहेब अंतापुरकर यांचे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या विधानसभा जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. राज्यात अकस्मातपणे उदयास आलेल्या महाविकास आघाडी मुळे या पोटनिवडणुकीमध्ये वेगळ्या पद्धतीचे वादळ निर्माण झाले आहे. गेली १५ वर्ष म्हणजे तब्बल तीन टर्म या ठिकाणाहून आमदार राहिलेले शिवसेनेचे सुभाष साबणे यांनी पक्षाकडे या जागेसाठी तिकीट मागितले, परंतु महाविकासआघाडी मधील आमदाराच्या मृत्यूनंतर त्या आमदाराचा घरांमध्ये जागा देण्याच्या परंपरेनुसार काँग्रेसचे माजी आमदार अंतापूरकर यांच्या पुत्राला या ठिकाणावरून तिकीट जाहीर करण्यात आले. गेली 15 वर्ष याच जागेसाठी शिवसेना आणि काँग्रेस मध्ये अत्यंत चुरशीचे सामने होत आले आहेत. यात तीन वेळा विजयी झालेल्या सुभाष साबणे यांना या पोटनिवडणुकीमध्ये उभारण्याची इच्छा होती आणि ती इच्छा त्यांनी पक्षाकडे व्यक्त देखील केली होती प्रचंड जनसंपर्क असलेला आणि सामान्यांमध्ये लोकप्रिय असलेला नेता म्हणून सुभाष साबणे यांची ओळख आहे आणि त्याच जीवावर या निवडणुकीचे तिकीट शिवसेनेला मिळावे यासाठी आजवर ते प्रयत्न करत राहिले. परंतु पक्षातर्फे त्यांना डावलण्यात आले आहे महाविकास आघाडीच्या नावाखाली ही जागा कॉंग्रेसला सोडण्याची तयारी शिवसेनेने केली आणि त्या क्षणी गेली कित्येक वर्ष देगलूर विधानसभेचे नेतृत्व करणारे सुभाष साबणे यांच्या मागे इथला शिवसैनिक ठामपणे उभा होता. हे तिकीट सुभाष साबणे यांनाच मिळावे यासाठी तो आग्रह होता. परंतु ऐनवेळी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेसला ही जागा देण्याचे निश्चित केले आणि ही जागा सुभाष साबणे यांच्या हातून गेली. आज सुभाष साबणे यांनी भाजपमध्ये प्रवेश करून निवडणूक लढवण्याचा निर्णय जाहीर केला आणि शिवसैनिकांची खदखद बाहेर यायला सुरू झाली.
शिवसेना सोडत असल्याचा निर्णय जाहीर करताना सुभाष साबणे यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून तिथल्या प्रत्येक शिवसैनिक रडवेला झाला होता. लढवय्या असलेला शिवसैनिक आज रडवेला झाला याचं कारण एकच आहे ते म्हणजे गेली अनेक वर्षे त्यांच्यासोबत आम्ही संघर्ष केला आज त्यांच्या मांडीला मांडी लावून त्यांचा प्रचार करण्याची वेळ येईल अर्थात त्यांची तळी उचलण्याची वेळ या शिवसैनिकांवर येईल याची कधी कल्पनाही इथला शिवसैनिकांनी केली नव्हती आणि म्हणूनच स्थानिक शिवसैनिकांनी आमदार माजी आमदार सुभाष साबणे यांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला सुभाष साबणे यांना भारतीय जनता पक्षातर्फे आज तिकीट जाहीर करण्यात आले आणि संपूर्ण देगलूर तालुक्यामध्ये सुभाष साबळे यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण संचारले आहे सुभाष साबणे आणि त्यांच्या समर्थकांचा विरोध हा शिवसेनेला किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना नक्कीच नाही परंतु काँग्रेसचे नेते अशोकराव चव्हाण यांनी केलेल्या अन्यायाविरुद्ध दंड थोपटून उभा राहण्यासाठी सुभाष साबणे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचा मार्ग निवडला एवढे मात्र निश्चित आहे सुभाष साबणे यांचा दांडगा जनसंपर्क आणि त्यांची लोकप्रियता पाहता येणाऱ्या निवडणुकीत त्यांचे पारडे जड असेल एवढे निश्चित खऱ्या अर्थाने ही निवडणूक कोण जिंकलं विकासासाठी प्रयत्न करणारे सुभाष साबणे की तिच्या जोरावर निवडणुका लढवणाऱ्या काँग्रेसच्या उमेदवार याचा फैसला जनता या निवडणुकीत करेल