नावडतीचं मीठ आळणी; अमृता फडणवीसांवर मुंबईच्या महापौरांची टीका
![](https://dg24.in/wp-content/uploads/2021/06/kishori-pednekar.jpg)
मुंबई : राज्य सरकारच्या कामकाजावर आणि पुण्यातील मेट्रोच्या श्रेयावादावर अमृता फडणवीस यांनी जोरदार टीका केली. तसेच पुण्यातील कोरोना परिस्थितीवरुन निर्बंध न हटविण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं. अमृता फडणवीस यांनी केलेल्या टीकेसंदर्भात मुंबईच्या महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना, नावडतीचं मीठ आळणी अशी टीका त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर केली आहे.
कोण अमृता फडणवीस? विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी का? नावडतीचं मिठ आळणी, अशी त्यांची अवस्था झाल्याचे किशोरी पेडणेकर यांनी म्हटले. तसेच आपल्याला त्यांच्याबद्दल जास्ती बोलायचं नाही, असं म्हणत त्यांनी विषयही टाळला. मात्र, मोजक्याच शब्दात त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीकाही केला.
दरम्यान, अमृता फडणवीस यांनी गुरूवारी पुण्यात एका कार्यक्रमाला हजेरी लावली. येथील धागा हॅन्डलूम महोत्सवाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं असून, महोत्सवाचं उद्घाटन अमृता फडणवीस यांच्या हस्ते झालं. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना राजकीय विषयांवरही त्यांनी भाष्य केलं. तसेच, महाविकास आघाडी सरकारला टोलाही लगावला होता.