जसप्रीत बुमराहची नवी इनिंग सुरु, स्टार अँकर संजना गणेशनसोबत लगीनगाठ
टीम इंडियाचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह विवाहबद्ध झाला आहे. बुमराह प्रसिद्ध क्रीडा निवेदिका संजना गणेशनसोबत लग्नबेडीत अडकला आहे. हा विवाहसोहळा गोव्यात पार पडला आहे. आता बुमराहच्या जीवनातील नव्या इनिंगला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुमराहचं लग्न मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.