Top Newsस्पोर्ट्स

तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी क्रिकेट रसिकांना इडन गार्डन्समध्ये मिळणार प्रवेश

कोलकाता : टीम इंडिया आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा टी-२० सामना २० ऑक्टोबरला होणार आहे. परंतु हा सामना पाहण्यासाठी जवळपास २० हजार क्रिकेट प्रेमींना भारतीय क्रिकेट नियामक मंडळा (बीसीसीआय) ने परवानगी दिली आहे यामध्ये बंगाल क्रिकेट संघाचे सदस्य देखील असणार आहेत. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सीएबी प्रमुख अविषेक डालमिया यांना एक पत्र लिहिलं आहे. काही पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केल्यानंतर इडन गार्डन्समध्ये वेस्ट इंडिज विरूद्ध होणारा टी-२० सामना पाहण्यासाठी प्रेक्षकांना परवानगी देण्यात आल्याचं त्यांनी पत्रामध्ये म्हटलं आहे. तसेच कॅबद्वारे सदस्यांना आणि संलग्न युनिट्सना फक्त मोफत तिकिटं दिली जाणार आहेत.

डालमिया म्हणाले की, बीसीसीआयने मंजरू दिल्याबद्दल त्यांचे आम्ही आभारी आहोत. बोर्डाच्या या संमतीमुळे कॅबला २० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सामन्यासाठी लाईफ असोसिएट, वार्षिक आणि मानद सदस्यांप्रती असलेली जबाबदारी पूर्ण करता येईल. बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांनी यापूर्वीही पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, बीसीसीआय प्रेक्षकांना सामन्यासाठी परवानगी देणार नाही. कारण खेळाडूंच्या आरोग्याला कोणत्याही प्रकारचा धोका पोहोचू नये. यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला होता.

मात्र, डालमिया यांनी बोर्डाला चाहत्यांना प्रवेश देण्याची विनंती केली होती. तसेच मागील वर्षातील नोव्हेंबर महिन्यात टीम इंडिया आणि न्यूझीलंडमधील टी-२० सामन्यात ७० टक्के प्रेक्षकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला होता. बुधवार आणि शुक्रवार होणाऱ्या पहिल्या दोन टी-२० सामन्यांसाठी, कॉर्पोरेट बॉक्स आणि डॉ. बीसी राय क्लबहाऊसच्या वरच्या स्तरावर २ हजारांहून अधिक चाहत्यांना परवानगी देण्यात आली आहे.

पहिल्या दोन सामन्यांचे पास फक्त प्रयोजकांच्या प्रतिनिधींना दिले जातात. यामुळे अहमदाबादमधील खुल्या स्टेडियममध्ये तीन सामन्यांची वनडे मालिका खेळवली गेली. टीम इंडियाची श्रीलंकेविरूद्ध पुढील मालिका २४ फेब्रुवारी रोजी लखनऊ येथे खुल्या स्टेडियमवर होणार आहे. त्यामुळे आता वेस्ट इंडिज विरूद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यासाठी कोलकाताच्या इडन गार्डन्स मैदानावर बीसीसीआयने परवानगी दिली असून त्यांचा शब्द खरा ठरणार का, हे पाहणं महत्त्त्वाचं ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button