Top Newsराजकारण

गोमूत्र अँटिबायोटिक, ते प्यायल्यास संसर्गजन्य रोग बरे होतात; खा. प्रज्ञा सिंह ठाकूर यांचा दावा

भोपाळ – देशातील कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. रुग्णांची संख्या तब्बल तीन कोटींवर पोहोचली आहे तर लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारांकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहे. मात्र, गेल्या काही दिवसांत आढळून येणाऱ्या कोरोना रुग्यांच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ झाली आहे. याच दरम्यान भाजपा नेत्या आणि भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी एक नवा दावा केला आहे. गोमूत्र हे हाय अँटिबायोटिक असल्याचं ठाकूर यांनी म्हटलं आहे.

भोपाळमध्ये एका कार्यक्रमादरम्यान प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी अजब विधान केलं असून ते सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मी कोरोनापासून वाचले, कारण मी दररोज गोमूत्राचं सेवन करते, असं देखील याआधी ठाकूर यांनी म्हटलं आहे. मात्र आता आम्ही गोमूत्र पवित्र मानतो. तर अनेक संशोधक असंही म्हणतात की गोमूत्र हाय अँटिबायोटिक आहे. संशोधनातील दाव्यांनंतर आम्हाला आढळलं की गोमूत्र प्यायल्यास सर्व संसर्गजन्य रोग बरे होतात” असा दावाच प्रज्ञा सिंह ठाकूर केला आहे. ठाकूर यांच्या या नव्या विधानावरून अनेकांनी जोरदार निशाणा साधला आहे.

ठाकूर यांनी गोमूत्राचे फायदे सांगण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. देशातील कोरोना दुसऱ्या लाटेच्या कालावधीदरम्यान त्यांनी असच एक अजब विधान केलं होतं. मी कोरोनापासून वाचले. कारण मी दररोज गोमूत्राचं सेवन करते असं म्हटलं होतं. एका कार्यक्रमादरम्यान ठाकूर यांनी गोमूत्र प्यायल्याने फुफ्फुसाचा संसर्ग बरा होतो. मी स्वतः दररोज गोमूत्राचा अर्क घेते. म्हणूनच मला करोनाचा संसर्ग झाला नाही, असं सांगितलं होतं. तसेच कोरोना बरा होण्यासाठी हनुमान चालीसा म्हणण्याचा उपाय सुचविला होता. हनुमान चालीसा म्हणा, कोरोना बरा होईल असा देखील सल्ला दिला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button