‘अमेझॉन इंडिया’च्या कर्मचाऱ्यांच्या आर्थिक संरक्षणासाठी ‘कोव्हिड -१९ रिलीफ स्कीम’ सुरु

मुंबई : कोरोनाच्या संकटातून देशाची वाटचाल होत असताना अमेझॉन इंडियाने आपल्या बिनीच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी अधिकच्या आर्थिक संरक्षणाची कोव्हिड -१९ रिलीफ स्कीम ( सीआरएस ) ही योजना सुरु केली आहे. कर्मचारी पुरवणा-या संस्थांमार्फत भरती केलेल्या पहिल्या फळीच्या तसेच इतर पात्र कर्मचा-यांना या योजनेनुसार खास कोव्हिड -१९ भत्ता प्रत्येकी ३६००० रुपये एकरकमी दिला जाईल. यातून कामाच्या ठिकाणी कोव्हिड विषयक सुरक्षेसाठी वापरण्याच्या वस्तू, वैद्यकीय उपकरणे आणि औषधे यासाठीचा खर्च होऊ शकेल. हॉस्पिटल मध्ये झालेला खर्च जर कर्मचा-याच्या विमा रकमेपेक्षा जास्त असेल तर अमेझॉन विमा कंपनीने मान्य केलेल्या खर्चापैकी रु. १,९०,००० पर्यंतची रक्कम अतिरिक्त भरपाई म्हणून देईल.
या आव्हानात्मक स्थितीत अमेझॉन इंडिया आपल्या कर्मचाऱ्यांसाठी कोव्हिड -१९ रिलीफ स्कीमच्या व्यतिरिक्त आवश्यक असे अनेक त-हेचे साह्य देत आहे. कर्मचारी पुरवणा-या संस्थांमार्फत भरती केलेल्या देशात कोठेही नेमलेल्या पहिल्या फळीच्या कर्मचा-यांना एका महिन्याच्या पगाराइतकी आगाऊ रक्कम कोव्हिड -१९ शी संबंधित वैद्यकीय खर्च करण्यासाठी मिळेल तसेच विलगीकरण करावे लागल्यास भरपगारी रजाही मिळेल. सर्व कर्मचा-यांना अमेझॉन इंडिया राज्य विमा योजना आणि आरोग्य विमा यांसारखे फायदे देते.
सरकारने कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केलेल्या भागात राहणा-या पहिल्या फळीच्या कर्मचा-यांना स्थानिक निर्बंधांमुळे कामावर येणे अशक्य झाल्यास ७५०० रुपये निर्वाह भत्ता दिला जाईल. या श्रेणीतील कर्मचारी टेलि-कन्सल्टिंग किंवा ऑनलाईन आरोग्य सल्ला अथवा समुपदेशन या सेवा कर्मचारी साह्य योजनेनुसार मिळू शकतील. अमेझॉन इंडिया च्या पहिल्या फळीच्या कर्मचा-यांना कोव्हिड -१९ शी संबंधित तातडीने मदत लागल्यास देण्यासाठी कोव्हीड योद्धेही सज्ज आहेत. अमेझॉन इंडिया चे कोव्हिड-१९ मधून बरे झालेले आणि प्लाझ्मा दान करू इच्छिणारे कर्मचारी यांचा आणि इतर कर्मचा-यांचा संपर्क करून देण्याची सोयही करण्यात आलेली आहे.
डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर आणि आय हॅव स्पेस पार्टनर यांनाही आरोग्य विम्याचा लाभ देण्यात आला आहे. हा लाभ अमेझॉन साह्य निधी ( अमेझॉन रिलीफ फंड- एआरएफ ) च्या व्यतिरिक्त आहे. अमेझॉन रिलीफ फंड हा २.५ कोटी अमेरिकन डॉलर चा निधी डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर प्रोग्रॅम, अमेझॉन फ्लेक्स प्रोग्रॅम आणि ट्रकिंग पार्टनर यातील व्यावसायिक भागीदारांना कोव्हीड-१९ मुळे सोसाव्या लागणा-या आर्थिक चणचणीच्या परिस्थितीत मदत देण्यासाठी उभारलेला निधी आहे.
अमेझॉन इंडिया च्या भारतातील व्यवसायाच्या मनुष्यबळ संचालक स्वाती रुस्तगी म्हणाल्या, आमच्या सहका-यांवर कोव्हीड-१९ चे संकट आल्यास त्यांना वैद्यकीय आणि आर्थिक साह्य उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. कोव्हिड -१९ साह्य योजनेच्या माध्यमातून आम्ही कर्मचा-यांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना आरोग्य विमा आणि आर्थिक साह्य याचा आणखी एक मार्ग उपलब्ध केला आहे.
अमेझॉन आपल्या पहिल्या फळीच्या आणि इतर सर्वच कर्मचा-यांना लवकरात लवकर प्रतिबंधक लस टोचून घेण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. देशभरातील प्रत्येक कर्मचा-यांना लसीचे दोन डोस घेण्यासाठी १५०० रुपयांचा खास भत्ता देत आहे. लस घेण्यासाठी केलेल्या खर्चाची भरपाई तसेच हॉस्पिटल मध्ये लस टोचून घेणे शक्य व्हावे यासाठी मदत अशा इतर मागणीही अमेझॉन प्रयत्नशील आहे. अमेझॉन इंडिया ने अलीकडेच आपले भारतातील कर्मचारी, डिलिव्हरी सर्व्हिस पार्टनर, अमेझॉन फ्लेक्स ड्रायव्हर , आय हॅव स्पेस पार्टनर, ट्रकिंग पार्टनर आणि या सर्वांचे कुटुंबीय अशा दहा लाख पेक्षा जास्त व्यक्तींच्या लसीकरणाचा खर्च करण्याची घोषणा केली आहे.