आरोग्य

कोरोनाचा दिलासा कायम, देशात गेल्या २४ तासांत नव्या रुग्णसंख्येत मोठी घट

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासांमध्ये पुन्हा एकदा मोठी घट नोंदवली गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून एक लाखांच्या आत असलेले नव्या रुग्णांचे प्रमाण आता ८० हजारांपर्यंत खाली घसरले आहे. तर नव्या रुग्णांपेक्षा बऱ्या होणाऱ्या रुग्णांचेही प्रमाण अधिक राहिले आहे. मात्र चिंतेची बाब म्हणजे देशातील दैनंदिन मृत्यूंची संख्या मात्र अद्यापही तीन हजारांच्या वर नोंदवली जात आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशामध्ये कोरोनाच्या ८० हजार ८३४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच काल दिवसभरात देशात कोरोनामुळे तीन हजार ३०३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर दिवसभरात १ लाख ३२ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे देशातील कोरोनाच्या सक्रिय रुग्णांचे प्रमाण अधिकच घटले आहे.

दरम्यान, गेल्या २४ तासांतील ८० हजार ८३४ रुग्णांच्या वाढीमुळे देशातील एकूण रुग्णसंख्या ही २ कोटी ९४ लाख ३९ हजार ९८९ एवढी झाली आहे. तर काल दिवसभरात झालेल्या ३ हजार ३०३ मृत्यूंमुळे देशातील आतापर्यंतच्या कोरोनाबळींचा आकडा ३ लाख ७० हजार ३८४ वर पोहोचला आहे. दिलासादायक बाब म्हणजे देशातील कोरोना मुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण सातत्याने वाढत असून, काल १ लाख ३२ हजार ०६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली त्यामुळे देशातील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ कोटी ८० लाख ४३ हजार ४४६ एवढी झाली आहे. देशात सध्या १० लाख २६ हजार १५९ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत. तर देशातील लसीकरणाचा वेगही वाढत असून, आतापर्यंत २५ कोटी ३१ लाख ९५ हजार ४८ जणांना कोरोनावरील लसीचा डोस देण्यात आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button