राजकारण

घरगुती गॅस सिलिंडर २५ रुपयांनी महागला

नवी दिल्ली : पेट्रोलियम कंपन्यांनी घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात पुन्हा एकदा वाढ केली आहे. विना सबसिडीवाल्या एलपीजी सिलिंडरच्या दरात २५ रुपयांची वाढ करण्यात आली आहे.

यामुळे दिल्लीतील घरगुती सिलिंडरच्या १४.२ किलोच्या एलपीजी सिलिंडरचा दर ८५९.५ रुपये झाला आहे. ही दरवाढ सोमवारी रात्रीपासूनच लागू होणार आहे. कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरचा दर ८८६ रुपये, मुंबईमध्ये ८५९.५ रुपये, लखनऊ ८९७.५ रुपये एवढे दर झाले आहेत. याचबरोबर १९ किलोच्या कमर्शिअल सिलेंडरचे दर ६८ रुपयांनी वाढले आहेत. दिल्लीत याचा दर १६१८ रुपये झाला आहे.

तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या आणि पंधराव्या तारखेला एलपीजी गॅसच्या दरांचा आढावा घेतात. १ जुलैला तेल कंपन्यांनी गॅसचे दर २५ रुपयांनी वाढविले होते. यानंतर १ ऑगस्टलाही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात ७३.५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, घरगुती गॅसच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नव्हती. पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किंमतींबरोबरच घरगुती गॅसच्या दरातही वाढ होत असल्याने केंद्र सरकारला टीकेचे धनी व्हावे लागत आहे. मात्र, सरकार सर्व आंतरराष्ट्रीय किंमतींवर ढकलत आहे. काहीवेळा युपीए सरकारवर वाढत्या किंमतींचे खापर फोडले जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button