डॉ. हर्षवर्धन बळीचा बकरा ठरले; काँग्रेसचा मोदी सरकारवर जोरदार निशाणा

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार बुधवारी होऊन ४३ मंत्र्यांचा राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी झाला. मंत्रिमंडळाचा विस्तार करताना जुन्या मंत्र्यांपैकी १२ जणांचा राजीनामा घेण्यात आला आहे. त्यामध्ये प्रकाश जावडेकर, रविशंकर प्रसाद, डॉ. हर्षवर्धन आदी ज्येष्ठ मंत्र्यांचा समावेश आहे.
डॉ. हर्षवर्धन यांच्या राजीनाम्याची माहिती समोर आल्यानंतर काँग्रेसने मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. “बिचारे डॉ. हर्षवर्धन… ‘बळीचा बकरा’ ठरले” अशा शब्दांत हल्लाबोल केला आहे. माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी डॉ. हर्षवर्धन यांना मोदी सरकारकडून ‘बळीचा बकरा’ बनवण्यात आल्याचं म्हटलं आहे. जयराम रमेश यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.
Poor Dr. Harsh Vardhan, a good man has been made a scapegoat for monumental failures at the highest level — nowhere else. https://t.co/NA8NZiheNn
— Jairam Ramesh (@Jairam_Ramesh) July 7, 2021
‘बिचारे डॉ. हर्षवर्धन… उच्च स्तरावरच्या स्मारकीय अपयशासाठी एका चांगल्या व्यक्तीला बळीचा बकरा बनवण्यात आलं’ असं ट्विट जयराम रमेश यांनी केलं आहे. कोरोनाच्या काळात देशाच्या आरोग्य मंत्रालयावर खूप मोठा ताण वाढला. देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक आरोप आणि व्यवस्थापनाच्या त्रुटींवरुन टीकांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला सामोरं जावं लागलं होतं.




