‘सिट्रोएन’ सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’ भारतात सादर
चेन्नई : नवीन ‘सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’ आज भारतभरात दाखल झाली. तिच्या “फील” या मॉडेलची किंमत 29,90,000 रुपयांपासून सुरू होते, तर “शाईन” या मॉडेलची किंमत 31,90,000 लाखांपासून सुरू होते. या भारतभरातील शोरूममधील किंमती आहेत. या वाहनाचे वितरण देशभरातील ‘ला मेझॉन सिट्रोएन’ फिजिटल शोरूम्समधून आजपासून सुरू होत आहे.
नवीन ‘सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’ – प्रारंभिक किंमती (एक्स-शोरूम दिल्ली)
- फील (मोनो-टोन) – रु. 29,90,000 लाख
- फील (वाय-टोन) – रु. 30,40,000 लाख
- शाईन (मोनो-टोन / वाय-टोन) – रु. 31,90,000 लाख
‘सिट्रोएन’ची मालकी अधिक सुखदायी करण्याच्या दृष्टीने, कंपनी ‘सिट्रोएन फ्युचर श्युअर’ ही योजना भारतीय ग्राहकांसाठी सादर करीत आहे. या सर्वसमावेशक पॅकेजमुळे ग्राहकांना मासिक 49,999 रुपये या हप्त्यात सिट्रोएन बाळगणे शक्य होणार आहे, तसेच त्यासोबत ‘सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’वर भविष्यातील मुल्याची हमीही मिळणार आहे. या पॅकेजमध्ये नियमित देखभाल, विस्तारीत वॉरंटी, रोडसाईड असिस्टन्स आणि ऑन-रोड फायनान्सिंग या गोष्टी 5 वर्षांसाठी मिळतील.
‘सिट्रोएन’ने भारतातील 10 शहरांमध्ये ‘ला मेझॉन सिट्रोएन’ फिजिटल शोरूम्स उभारून आपण भारताला प्राधान्य देत असल्याचे सिद्ध केले आहे. नवी दिल्ली, गुडगाव, मुंबई, पुणे, अहमदाबाद, कोलकाता, बंगळुरू, हैदराबाद, कोची, चेन्नई येथील या शोरूम्समध्ये ग्राहकांना ‘एटीएडब्ल्यूएडीएसी’मधून (एनीटाईमएनीव्हेअरएनीडिव्हाईसएनीकंटेन्ट) अखंड, ओम्नी-चॅनेल रिटेल संकल्पनेचा अनुभव मिळेल. ग्राहकांच्या डिजिटल अनुभवास एका संपूर्ण ‘डिजिटल इकोसिस्टम’द्वारे अखंडपणे जोडले जाईल आणि ‘एटीएडब्ल्यूएडीएसी’ रिसेप्शन बार, ‘हाय डेफिनेशन (एचडी) थ्रीडी कॉन्फिगरेटर’ आणि ‘सिट्रोएन ओरिजिनल टचस्क्रीन’ यांद्वारे त्यांना शोरूममध्ये समृद्ध अनुभव मिळेल. ऑनलाईन आणि ‘ला मेझॉन सिट्रोएन’ वितरक या दोन्हींकडे उपलब्ध असलेल्या ‘एचडी 360 डिग्री थ्रीडी कॉन्फिगरेटर’मध्ये वास्तव वेळेतील त्रिमितीय दृश्यमानता मिळते आणि त्यातून अतिशय वास्तविक स्वरुपात दृष्ये पाहता येतात.
‘सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’साठी 100 टक्के थेट ऑनलाइन खरेदी योजनादेखील सुरू करण्यात येत आहे. वितरकांच्या नेटवर्कमध्ये नसलेल्या 50 हून अधिक शहरांमध्ये (ऑनलाइन नेटवर्कमधील शहरांची यादी परिशिष्टात नमूद) ही थेट ऑनलाईन खरेदीची सुविधा देण्यात आली असून ग्राहक थेट कारखान्यातून आपली गाडी घेऊ शकतील. याकरीता एक स्वतंत्र ई-कॉमर्स-सक्षम वेबसाईट निर्माण करण्यात आली आहे. तीत वित्तसहाय्य, विमा, देखभालीची वार्षिक योजना, अतिरिक्त वॉरंटी, तसेच ग्राहकाकडे असलेल्या विद्यमान गाडीचे एक्सचेंज आदी बाबी समाविष्ट आहेत. ‘टेस्ट-ड्राईव्ह’साठी समर्पित गाड्यांचा ताफा, ई-विक्री सल्लागार, ‘व्हर्च्युअल प्रॉडक्ट डेमो’ आणि ग्राहकाच्या दारी वितरणाची सुविधा आदी गोष्टीही यात उपलब्ध असणार आहेत.
कंपनीचे ‘ल अटेलिए सिट्रोएन’ हे विक्रीपश्चात सेवा देणारे नेटवर्क पुढील स्वरुपाच्या नाविन्यपूर्ण सेवा देईल –
– ग्राहकांना ताण-मुक्त मालकीच्या अनुभवाचे आश्वासन देण्यासाठी सर्वसमावेशक वॉरंटी व सुट्या भागांची 100 टक्के उपलब्धता, यांसह ‘रिमोट डायग्नोस्टिक्स’ सेवा.
– ‘सर्व्हिस ऑन व्हील्स’ या सेवेतून ग्राहकांना समाधानकारक अनुभव मिळेल. यामध्ये त्यांच्या दारी जाऊन सेवा किंवा दुरुस्तीची कामे करून देण्यात येतील.
– या सेवांना देशभरात ‘रोडसाईड असिस्टन्स सर्व्हिस’चे पाठबळ असेल. यामध्ये देशभरातील महत्त्वाच्या ठिकाणी 3 तासांच्या आत ग्राहकांपर्यंत पोहोचण्याची हमी देण्यात येते.
या सर्वांमधून ‘सिट्रोएन सर्व्हिस प्रॉमिस’ ही संकल्पना दृढ होते. ग्राहकांना “आपल्या हाताशी सर्व सुविधा” देणारी ही संकल्पना आहे.
‘सिट्रोएन अॅडव्हायझर’ या ‘ऑनलाईन रिव्ह्यू वेबसाईट’च्या माध्यमातून भारतात प्रथमच ग्राहकांना आपल्या उत्पादनाचा व मालकीच्या अनुभवाचा आढावा घेणे शक्य होणार आहे. ही पद्धत जगात अतिशय यशस्वी ठरलेली असून यामुळे ग्राहकांना त्यांचे वितरक, त्यांची कार आणि त्यांचे विक्री सल्लागार यांचे मानांकन करता येईल. वाहन उद्योग जगतातील हे एक अग्रणी साधन काळानुसार विकसीत झालेले आहे. त्यातून ‘सिट्रोएन’ला पारदर्शकता व ग्राहकांशी नजीकता या दृष्टीने एक पाऊल पुढे राहता येते.
‘सिट्रोएन’चे मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिन्सेंट कोबे म्हणाले, “नवीन ‘सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’चे सादरीकरण हा ‘सिट्रोएन’मध्ये आमच्या सर्वांसाठी एक अभिमानाचा क्षण आहे. ‘सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’ हे वाहन बाजारपेठेच्या अपेक्षांच्या पलीकडे जाणारे आहे. डिझाइन, आराम, प्रशस्तपणा, विविध उपकरणे आणि पॉवरट्रेन या बाबतीत हे वाहन सर्व गरजा पूर्ण करेल. आंतरराष्ट्रीय पातळीवरील त्याचे यश आणि आधुनिक तंत्रज्ञान भारतीय ग्राहकांना नक्कीच समाधान देईल. जागतिक दर्जा असलेली उत्पादने वापरण्यास ते पात्रच आहेत. ‘सिट्रोएन सी5 एअरक्रॉस एसयूव्ही’ आपला ब्रँड भारतात स्थापित करेल आणि सिट्रोएन कोणकोणत्या गोष्टींसाठी सक्षम आहे, ते दाखवून देईल. या सादरीकरणानंतर, ‘सिट्रोएन’ने भारतात एक नवीन अध्याय सुरू केला आहे. ‘बी-सेगमेंट’ कारच्या आमच्या नवीन कुटुंबातील हे पहिलेच वाहन बाजारात आणल्यानंतर, आम्ही येत्या काही महिन्यांत आणखी मोठी कामगिरी करू, अशी ग्राहक अपेक्षा बाळगू शकतात.”
‘सिट्रोएन इंडिया’च्या सेल्स अॅण्ड मार्केटिंग विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष रोलँड बुशाहा म्हणाले, “सिट्रोएन अॅडव्हान्स्ड कम्फर्ट’प्रोग्रामच्या सर्व घटकांना मूर्त रूप देणारी नवीन ‘सी5 एअरक्रॉस’ सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत. ग्राहकांना एकंदरीत चांगला अनुभव देण्यासाठी सिट्रोएन 360 डिग्री (सर्वांगीण) सुविधा देण्याच्या आमच्या प्रयत्नांनुसारच हे वाहन बनविण्यात आलेले आहे. अखंड ग्राहक अनुभव, मानवी-केंद्रितता आणि ‘ला मेसन सिट्रोएन’ फिजिटल नेटवर्कद्वारे डिजिटल पद्धतीने समाकलित होण्याची पद्धत, याद्वारे लोकांचे एकंदर हित साधण्यावर आमचे लक्ष केंद्रित असते. आमची नाविन्यपूर्ण उत्पादने व सेवा यांद्वारे आम्ही स्थितिवादाला आव्हान देत आहोत आणि भारतात कारखरेदी व वितरण यांच्या पद्धतीत नव्याने सुधारणा करीत आहोत. बाजारात सादर होण्यापूर्वीच ‘सी5 एअरक्रॉस’ गाडीसाठी 1 हजारहून अधिक ग्राहकांनी नोंदणी केली आहे. भारतातील बहुप्रतिक्षीत एसयूव्हींपैकी ती एक आहे. या गाडीच्या सादरीकरणाच्या निमित्ताने भारतातील आमचा प्रवास यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे.”