Top Newsराजकारण

कोंबडी चोर ! शिवसैनिकांचा नारायण राणेँवरील संताप पोस्टरबाजीतून उघड

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे शिवसैनिक चांगलेच संतप्त झाले आहेत. मुंबईतील दादर टीटी भागात शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक अमेय घोले यांनी नारायण राणे यांचा मोठा फोटो बॅनरवर लावला आहे. त्यावर “कोंबडी चोर !!!” असे नारायण राणेंना झोंबणारे शब्द लिहिले आहेत. त्यामुळे मुंबईतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून याचे आणखी तीव्र पडसाद उमटण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे. कारण, नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे. शिवसेना नेते सुधाकर बडगुजर यांनी नाशिक पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार केली होती. नाशिक पोलिसांच्या सायबर सेलने नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आता नाशिक पोलिसांचे पथक नारायण राणे यांना अटक करण्यासाठी चिपळूणच्या दिशेने रवाना झाले आहे. आता राजकीय वातावरण चांगलेच तापले असून याचे आणखी तीव्र पडसाद उमटण्याचीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button