स्पोर्ट्स

मोईन, जडेजाच्या फिरकीसमोर राजस्थानचे लोटांगण

आयपीएल : चेन्नई सुपर किंग्सचा राजस्थान रॉयल्सवर ४५ धावांनी विजय

मुंबई : मोईन अली आणि रविंद्र जाडेजा या फिरकी जोडगोळीच्या अप्रतिम गोलंदाजीमुळे चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ४५ धावांनी मात केली. हा चेन्नईचा सलग दुसरा विजय ठरला. मोइन अली आणि रवींद्र जडेजा यांनी या सामन्यात राजस्थानच्या फलंदाजांना चांगलेच नाचवले. या फिरकीपटूंच्या जोरावरच चेन्नईला राजस्थानवर दणदणीत विजय मिळवता आला. या सामन्यापूर्वी गुणतालिकेत चेन्नईचा संघ हा चौथ्या स्थानावर होता. कारण दोन सामन्यांमध्ये त्यांनी एक विजय मिळवला होता आणि एक पराभव पत्करावा लागला होता. पण आजच्या सामन्यातील विजयानंतर चेन्नईच्या संघाने मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे.

या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ९ बाद १८८ अशी धावसंख्या उभारली. याचा पाठलाग करताना सॅम करनने मनन वोहरा (१४) आणि कर्णधार संजू सॅमसन (१) यांना बाद करत राजस्थानला दोन झटके दिले. जॉस बटलरने ३५ चेंडूत ४९ धावांची खेळी केल्यावर त्याला जाडेजाने बाद केले. मोईन अलीने डेविड मिलर (२), रियान पराग (३) आणि क्रिस मॉरिस (०) यांना माघारी पाठवत राजस्थानला अडचणीत टाकले. यातून राजस्थानचा संघ सावरू शकला नाही आणि त्यांना २० षटकांत ९ बाद १४३ धावाच करता आल्या. चेन्नईकडून जाडेजा आणि करनने २-२, तर मोईनने ३ विकेट घेतल्या.

चेन्नईने राजस्थानपुढे या सामन्यात १८९ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानला मनन व्होराच्या रुपात पहिला धक्का बसला. राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसन यावेळी फक्त एकाच धावेवर बाद झाला, हा राजस्थानसाठी मोठा धक्का होता. पण त्यानंतर जोस बटलरने चेन्नईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत राजस्थानची धावगती वाढवली होती. पण यावेळी मोठा फटका मारण्याच्या नादात बटलर आऊट झाला. रवींद्र जडेजाने यावेळी बटलरने त्रिफळाचीत केले, बटलरचे अर्धशतक यावेळी फक्त एका धावेने हुकले.

जडेजाने याच १२ व्या षटकात बटलरबरोबर शिवम दुबेलाही बाद केले आणि राजस्थानला दुहेरी धक्के दिले. त्यानंतर मोइन अलीने राजस्थानच्या फलंदाजांना चांगलेच नावचवले. अलीने यावेळी महागडा खेळाडू असलेला ख्रिस मॉरिस, रायन पराग आणि डेव्हिड मिलवर या तिघांनाही बाद करत सामना चेन्नईच्या बाजूने झुकवला.

चेन्नईचा ऋतुराज गायकवाड या सामन्यातही अपयशी ठरला आणि त्याला १० धावांवर समाधान मानावे लागले . ऋतुराज बाद झाल्यावर फॅफ ड्यू प्लेसिसने धडाकेबाज फलंदाजी खेळी केली. फॅफने यावेळी राजस्थानच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. फॅफने यावेळी १७ चेंडूंत ३३ धावा केल्या, यामध्ये चार चौकार आणि दोव षटाकारांचा समावेश होता. फॅफ बाद झाल्यावर मोइन अली, सुरेश रैना आणि अंबाती रायुडू यांनी चांगली फलंदाजी केली. पण या तिघांनाही यावेळी मोठी धासंख्या साकारता आली नाही. धोनी आणि जडेजा यांनीही चांगली फलंदाजी केली. पण ड्वेन ब्राव्होने अखेरच्या षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. ब्राव्होने यावेळी आठ चेंडूंत नाबाद २० धावा केल्या आणि त्यामुळेच चेन्नईला १८८ धावा करता आल्या.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button