Top Newsराजकारण

अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करा; चंद्रकांत पाटलांचे अमित शाहांना पत्र

मुंबई : भाजपने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे. भाजपने नुकत्याच झालेल्या कार्यकारिणी बैठकीमध्ये याबाबतचा ठराव संमत केला होता. त्याप्रमाणे आता भाजपने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहून अजित पवार, अनिल परब यांची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसं निवेदन पाठवले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्याविरोधात सचिन वाझे याच्या पत्रात वसुलीचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे त्यांची सीबीआयतर्फे सखोल चौकशी करा, असं चंद्रकांत पाटील यांनी निवेदनात म्हटलं आहे. प्रदेश भाजपच्या एक कोटी दहा लाख सदस्यांतर्फे आपण ही मागणी करत असल्याचा चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आता भाजप प्रदेशाध्यक्षांनी केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र पाठवल्यानंतर अमित शाह कोणता निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांचीही सीबीआय चौकशी करावी, असा ठराव भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत २५ जून रोजी मांडण्यात आला. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बसंदर्भात अजित पवार आणि शिवसेना नेते- परिवहन मंत्री अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button