२०२४ च्या निवडणुकीत जयंत पाटलांना घरी बसवू : चंद्रकांत पाटील
सांगली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना आगामी २०२४ च्या निवडणुकीत घरी बसवू, असा दावा केलाय. ते सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथे बोलत होते. चंद्रकांत पाटील यांनी नानासाहेब महाडिक शैक्षणिक संकुल याठिकाणी विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांसमोर बोलताना हा दावा केलाय. जर सर्वानी एकजूट दाखवली तर जयंत पाटील यांना २०२४ च्या निवडणुकीत घरी पाठवू, असा विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांसमोर व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राहुल महाडिक आणि सम्राट महाडिक यांना छद्मीपणे बोलण्याचा परमेश्वराने एक आशिर्वाद दिलाय. पण कार्यकर्ते बरोबर असतील २०२४ च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू. जर आपण आपल्यात एकजूट ठेवली असती तर ते या निवडणुकीत देखील शक्य होतं. त्यामुळे पुन्हा एकदा सर्वजण एकजुटीने काम करु.