टाटा ट्रस्ट्स आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसकडून सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशन लाँच

मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसने (टीआयएसएस) संस्थापकीय सहयोगी म्हणून टाटा ट्रस्ट्ससोबत सहयोगाने सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशन (सीईटीई) लाँच केले आहे. टीआयएसएस मुंबई येथील स्वतंत्र सेंटर म्हणून आज नॅशनल कौन्सिल फॉर टीचर एज्युकेशनचे अध्यक्ष आयएएस संतोष कुमार सारंगी यांच्या हस्ते या आस्थापनाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी टाटा ट्रस्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ एन. सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते.
देशातील या अनोख्या सेंटरचा देशातील सर्वात दुर्लक्षित क्षेत्रांपैकी एक शिक्षण विकासामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यासाठी उत्प्रेरक बनण्याचा मनुसबा असेल. हे सेंटर सीईटीईच्या दृष्टिकोनाला अधिक दृढ करण्यासाठी पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करेल – (१) शैक्षणिक उपक्रम (दीर्घकालीन व लघुकालीन व्यावसायिक विकास कोर्सेस), (२) संशोधन (फिल्ड अॅक्शन रिसर्च, डिझाइन लॅब, चेअर प्रोग्राम्स व शैक्षणिक प्रकाशने), (३) यंत्रणेचे सक्षमीकरण (राज्य, जिल्हा व उप-जिल्हा स्तरांवर शासकीय शैक्षणिक यंत्रणा), (४) तंत्रज्ञान सक्षम उपक्रम (कनेक्टेड लर्निंग उपक्रम, शिक्षणातील एकात्मिक तंत्रज्ञान, मुक्त शैक्षणिक संसाधनांचा विकास, सराव समुदाय), (५) पुराव्यावर आधारित धोरण सल्ला (गोलमेज, परिषद, धोरणाची माहिती, संशोधन, संप्रेषण मोहीमा).
टाटा ट्रस्ट्स शिक्षक, शालेय अध्ययन वातावरणाचा विकास करत आणि शैक्षणिक नेतृत्वाला प्रबळ करत वंचित समुदायांमधील मुलांचा शैक्षणिक दर्जा सुधारण्याप्रती काम करते. ट्रस्टने संस्था व शिस्तबद्ध निर्माणाच्या माध्यमातून जटिल सामाजिक समस्यांचे निराकरण करण्यामध्ये गुंतवणूक केली आहे. प्रबळ बहुशिस्तबद्धीय टीमसह सीईटीईची स्थापना ट्रस्ट्सच्या शिक्षण शिक्षण उपक्रमाशी संलग्न आहे. या उपक्रमाचा दर्जात्मक शिक्षक विकासासाठी मोठ्या प्रमाणात दीर्घकालीन प्रभाव निर्माण करण्याचा मनसुबा आहे.
सीईटीईला पंडित मदन मोहन मालविया नॅशनल मिशन ऑन टीचर्स अॅण्ड टीचिंगकडून काही निधीसाह्य मिळाले आहे. संस्थापकीय सहयोगी म्हणून टाटा ट्रस्ट्ससोबत सीईटीईचे शिक्षकांच्या शिक्षणाला नवसंजीवनी देण्याचे ध्येय आहे. शिक्षक आणि त्यांच्या व्यावसायिक विकासावरील भर वाढला आहे आणि आता संशोधन, संबंधित शैक्षणिक लघुकालीन व दीर्घकालीन उपक्रम, धोरण सल्ला, भागीदारी व सहयोग, तसेच एड टेकमधील मोठ्या स्तरावरील कृतीशील प्रकल्प यावर भर देण्यात आला आहे. या सर्व गोष्टी प्रो. पद्मा सारंगपानी यांच्या नेतृत्वांतर्गत नवीन सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशन (सीईटीई)च्या लाँचसह संपादित करण्यात येतील.
सीईटीईच्या अलिकडील काही उपक्रमांपैकी एक नो टीचर नो क्लास – स्टेट ऑफ दि एज्युकेशन रिपोर्ट फॉर इंडिया २०२१ या उपक्रमाने अध्यापन व शिक्षकांच्या शिक्षणाच्या जटिल स्वरूपावर भर दिला. टीआयएसएस येथील सीईटीईच्या प्रबळ शैक्षणिक टीमने रचलेला हा रिपोर्ट युनेस्कोद्वारे रीलीज करण्यात आला. भारतातील शिक्षक व त्यांच्या शिक्षकांसाठी दर्जेदार शैक्षणिक व अध्यापन संसाधने देण्यसोबत सेंटरचे सध्या दक्षिण आशिया व आफ्रिकामध्ये प्रकल्प सुरू आहेत.
सन्माननीय अतिथी टाटा ट्रस्ट्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनाथ एन. म्हणाले, ”टाटा ट्रस्ट्सने नेहमीच शिक्षणावर अधिक भर दिला आहे. आम्ही विज्ञान, सामाजिक शास्त्र व कलामध्ये उच्च शिक्षण देणा-या राष्ट्रीय संस्थांची स्थापना करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. उत्तमरित्या शिक्षित शिक्षक, सुधारित अध्ययन वातावरण आणि शिक्षक व शाळांना पाठिंबा देण्यासाठी यंत्रणेच्या क्षमतेमध्ये वाढ शिक्षणामध्ये समानता व दर्जाची खात्री देईल. टीआयएसएससोबत सहयोगाने आम्ही आशा करतो की, सेंटर ऑफ एक्सलन्स इन टीचर एज्युकेशन (सीईटीई) एक आदर्श स्थापित करेल आणि भविष्यासाठी सक्षम नागरिक व भविष्यकालीन शैक्षणिक यंत्रणा निर्माण करेल.”
टीआयएसएस येथील संचालिका डॉ. शालिनी भरत म्हणाल्या, ”सीईटीईचे लाँच टीआयएसएसच्या बदलत्या सामाजिक वास्तविकतांना, तसेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ला प्रतिसाद देणारे उच्च दर्जाचे संशोधन व शैक्षणिक उपक्रम डिझाइन करण्याच्या दृष्टिकोनाला अधोरेखित करते. सीईटीई देशातील शिक्षकांच्या दर्जामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणण्यास महत्त्वाची भूमिका बजावेल. या कार्यासाठी बहुशिस्तबद्दीय पैलू व ज्ञान, प्रवृत्ती व मूल्यांची निर्मिती आणि क्षेत्राशी संबंधित सर्वोत्तम मेन्टॉर्सच्या मार्गदर्शनांतर्गत पद्धतीच्या विकासाची गरज आहे. हेच आमच्या संस्थेचे सामर्थ्य आहे. आम्ही शिक्षकांच्या शिक्षणामध्ये दर्जा व समानतेला चालना देण्यासाठी विविध भागधारकांसोबत सहयोगाने काम करण्याची कटिबद्धता कायम राखतो.”
टीआयएसएसमधील सीईटीईच्या डॉ. पद्मा एम. सारंगपानी म्हणाल्या, ”एनईपीने (राष्ट्रीय शैक्षणिक धोरण) क्षेत्रासाठी दृष्टिकोन ठेवलेल्या आमूलाग्र बदलामध्ये शिक्षकांना प्राधान्य दिले आहे. यामुळे सीईटीईचे ध्येय लक्षणीय बनण्यासोबत अगदी योग्य वेळी सादर करण्यात आली आहे. शिक्षकांच्या शिक्षणामध्ये दर्जात्मक सुधारणा, शिक्षकांसाठी करिअर संधींशी जुडलेल्या व्यावसायिक विकासामध्ये वाढ आणि त्यांची सेवा व रोजगारक्षमता सुधारण्यासाठी सल्ला हे मुख्य केंद्रित क्षेत्रे आहेत. आमची बहुतशिस्तबद्धीय तज्ञ टीम, उच्च दर्जाचे संशोधन, क्षेत्रानुसार कृती व सल्ला आणि आमचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय सहयोग व भागीदारी यामध्ये आमचे नैपुण्य आहे.”
एनसीटीईचे अध्यक्ष श्री. संतोष सारंगी म्हणाले, ”सीईटीईचे लाँच एनसीईटीई (नॅशनल कमिशन ऑन एक्सलन्स इन टीचर एज्युकेशन) राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पाहत असलेल्या काही आदेश व उद्दिष्टांना चालना देते. आमच्या कार्याच्या काही प्रमुख पैलूंमध्ये उपलब्धता, दर्जा, किफायतशीरपणाच्या उपलब्धतेसोबत इतर प्रमुख क्षेत्रांवर फोकसचा समावेश आहे. हे धोरण चार किंवा पाच आधारस्तंभांवर देखील भर देते, जे देशातील विद्यार्थी व शिक्षकांच्या समस्यांचे व्यापक प्रमाणात निराकरण करतात. देशातील शिक्षण विभागाकडे लक्ष देणे गरजेचे आहे आणि या विभागामध्ये शिक्षकांच्या शिक्षणामधील दर्जा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावेल. शिक्षकांसाठी राष्ट्रीय व्यावसायिक मानके विकसित करण्याकरिता आदेश, शालेय स्तरावर मार्गदर्शनासाठी महत्त्वाकांक्षेचा विकास एनसीईटीईशी संलग्न आहेत. आम्हाला या क्षेत्रामध्ये प्रख्यात उद्योग अग्रणींसोबत सहयोगाने काम करण्याचा आनंद होत आहे.”