ठाण्याच्या साकेत सोसायटीमधील CCTV फुटेज सचिन वाझेंनीच गायब केल्याचा संशय
मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरणात आता एक नवीन माहिती पुढे आली आहे. याप्रकरणातील मुख्य संशयित असलेले API सचिन वाझे (Sachin Vaze) यांनी ते राहत असलेल्या साकेत सोसायटीमधील CCTV फुटेज गायब केल्याचा राष्ट्रीय तपास यंत्रणे (NIA) ला संशय आहे.
ही सर्व पत्रे साकेत सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना लिहली आहेत. यामध्ये त्यांनी आपल्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज असलेला डीव्हीआर मुंबई पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आल्याचा उल्लेख आहे. सोसायटीने मुंबई पोलिसांना एकूण दोन पत्रं लिहली आहेत. सचिन वाझे यांनी त्यांचे सहकारी रियाझ काझी यांच्यामार्फत साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याचे समजते.
सचिन वाझे यांच्या गुप्तवार्ता शाखेने (CIU) साकेत सोसायटीमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कमेऱ्याचे फुटेज सोसायटीकडून मागितले होते, त्यासंदर्भात त्यांनी सोसायटीला पत्र लिहिले होते. मात्र पत्रावर कुठेही पोलिसाचा सही शिक्का नसल्याने सोसायटीने त्या टीममधल्या सर्वांची नावे, नंबर आणि सही त्या पत्रावर घेतली. साकेत सोसायटीला काहीसा संशय आल्याने 4 मार्चला याच सोसायटीने स्थानिक पोलीस स्टेशन असलेल्या राबोडी पोलीस स्टेशनला एक पत्र लिहिले आहे. यामध्ये आमच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज CIU युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी घेतले असल्याने, तुम्हाला माहिती व्हावी म्हणून पत्र देतोय असे म्हटले आहे.
हे पत्र ठाणे एटीएसने लिहिले आहे. ज्यात साकेत सोसायटीचे सीसीटीव्ही आम्हाला हवे असून, 17 फेब्रुवारी रात्री 12 पासून, 25 फेब्रुवारी रात्री 11 पर्यंत आम्हाला फुटेज हवे असल्याचे सांगितले होते. मात्र एटीएसला ते मिळाले नाहीत, कारण सीसीटीव्ही फुटेजचा डीव्हीआर CIU युनिटने आधीच नेला होता.