राजकारण
अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना ‘सीबीआय’चं समन्स

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी रुपयांची खंडणी वसुल करण्यास सांगितल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आता अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना सीबीआयनं समन्स बजावलं असून अनिल देशमुख यांचीही सीबीआय चौकशी होण्याची शक्यता आहे.