राजकारण

भाजपके बुरे दिन जल्द आएंगे! जय बच्चन यांचा राज्यसभेत संताप

नवी दिल्ली : एकीकडे पनामा पेपर्सप्रकरणी अभिनेत्री ऐश्वर्या रायची ईडी चौकशी सुरु असताना राज्यसभेत समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन सत्ताधारी भाजपवर चांगल्याच संतापल्या. त्यांच्या संतापामागे ऐश्वर्या रायच्या सुरु असलेल्या ईडी चौकशीचं कारण नाकारता येणार नाही. तुमचे वाईट दिवस लवकरच सुरु होणार आहेत. असा शाप मी देते, असं जया बच्चन सत्ताधाऱ्यांना उद्देशून म्हणाल्या. १२ खासदारांच्या निलंबनावरुन जरी जया बच्चन यांचा असा संताप झाला असला.

समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन यांनी राज्यसभेत बोलताना सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडलं. माझ्यावर वैयक्तीक टिपण्णी केली. माझा तुम्हाला शाप आहे, तुमचे लवकरच वाईट दिवस येणार आहेत. तुम्ही आमचा जीवच घ्या. तुम्ही काय करताय? कुणापुढे पुंगी वाजवत आहात?, असं वक्तव्य जया बच्चन यांनी राज्यसभेतील आपल्या युक्तीवादादरम्यान केलं आहे.

जया बच्चन यांच्या युक्तीवादानंतर राज्यसभेत प्रचंड गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये शाब्दिक चकमक झाली. अध्यक्षस्थानी असलेल्या भुवनेश्वर कलिता यांनी काही वेळासाठी राज्यसभा स्थगित करण्याचा निर्णय घेतला. १२ खासदारांचं निलंबन मागे घ्या आणि केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या राजीनाम्याची सोमवारी राज्यसभेत विरोधकांनी मागणी केली होती. यासाठी गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले होते. सकाळपासून याच मुद्द्यावर विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने आले होते. जोपर्यंत माफी मागितली जात नाही, तोपर्यंत निलंबन माघे घेतलं जाणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी भाजपने घेतली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button