Top Newsराजकारण

निवडणूक जिंकण्यासाठी हिंदू-मुस्लीम वाद पेटवण्याचा भाजपचा प्रयत्न; प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप

पिंपरी चिंचवड : टिपू सुलतान हा फार महत्वाचा मुद्दा नाही. आर.एस.एस. आणि भाजपसाठी अँटी मुस्लीम लाट निर्माण करणं हे निवडणूक जिंकण्याचं साधन आहे. आपला जनाधार कमी होतोय का या भीतीपोटी त्यांनी आता अँटी मुस्लीम भूमिका घ्यायला सुरूवात केली आहे. हा हिंदू मुस्लीम वाद पेटवण्यासाठीचा मुद्दा आहे, अशा शब्दांत वंचित बहुजन आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी भाजप नेत्यांच्या सध्याच्या भूमिकेवर प्रतिक्रिया दिली आहे.

पिंपरी चिंचवडमध्ये प्रकाश आंबेडकर पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले की, मुंबईतही भाजपने टीपू सुलतानचं नाव देण्यावरून वाद उपस्थित केला आहे. दंगल होईल अशी परिस्थिती आहे. जोवर हिंदू मुस्लीम वाद पेटत नाही, तोवर शासन आपल्या हातात येईल असं त्यांना वाटत नाही. म्हणून उद्याच्या कालावधीत ही परिस्थिती बदलेल असं मला वाटतं नाही.

मुंबईतील मालाडमधील क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्याचा वाद संपण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत. बुधवारी क्रीडा संकुलाला टिपू सुलतानचे नाव देण्यावरुन मालाडमध्ये भाजपातर्फे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. त्यासंदर्भात प्रकाश आंबेडकर बोलत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button