
मुंबई : रात्रीपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे शहराच्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. त्यामुळे मुंबईच्या वाहतुकीचा वेग मंदावला. रेल्वे सेवेसोबतच रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचं पाहायला मिळालं. मुंबईत पडणाऱ्या पावसामुळे अनेकदा पाणी साचण्याचे प्रकार घडत असतात. नेहमी याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं दिसून येते. त्यातच आता मुंबई महापालिकेची निवडणूकही जवळ आल्यानं महापालिकेतील सत्ताधारी शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी विरोधक सोडत नाहीत.
मुंबईच्या अनेक सखल भागात शुक्रवारी पाणी साचल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला. अमृता फडणवीस यांनी ट्विट करून म्हटलंय की, ‘इस शहर मै मिल ही जाएंगे, हर मोड पर गड्डे तालाब, पर ढूँढोंगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब’ असं सांगत अमृता फडणवीस यांनी एक फोटो पोस्ट करत शिवसेनेलाअप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
इस शहर में मिल ही जाएँगे, हर मोड़ पर गड्ढे-तालाब,
पर ढूँढोगे तो मुजरिम एक ना मिलेगा जनाब !#MumbaiRains #Monsoon2021 #Mumbai pic.twitter.com/zlrunfCwmR— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) July 16, 2021
शहरातील प्रत्येक वळणावर पाणी साचलेले खड्डे दिसतील. पण शोधायला गेलं तर एकही गुन्हेगार सापडणार नाही असं म्हणत अमृता फडणवीस यांनी मुंबई महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. या ट्विटसोबत अमृता फडणवीस यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. त्या फोटोत स्वत: अमृता फडणवीस साचलेल्या पाण्यात उभं राहून प्रशासन अपयशी ठरल्याचं दाखवून देत आहेत.
अमृता फडणवीस या विविध मुद्द्यांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ठाकरे सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडत असतात. काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत एक ट्विट केलं होतं. तसेच जनतेलाच ‘पहचान कौन?’ असं म्हणत एक कोड घातलं होतं.
“ओळखा कोण? एक राजा जो उंबरठा ओलांडत नाही, जनतेला भेट नाही आणि सत्य, कर्माच्या मार्गाने जात नाही. वसुलीशिवाय त्याचं काहीच काम होत नाही. महासाथीचा कहर तो सांभाळू शकत नाही आणि प्रगतीचं फूल ज्याच्या छायेखाली फुलत नाही” अशा शब्दांत अमृता फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. अमृता फडणवीस यांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या.
पहचान कौन?
एक राजा जो-
महल की चौखट से निकलता नही
अवाम से कभी मिलता नही
सत्य और कर्म की राह पर चलता नही
वसूली के बिन उसका पत्त्ता हिलता नही
महामारी का कहर उससे सम्हलता नही
प्रगति का फूल उसकी छाया में खिलता नही !
सच है, धोखा कभी फलता नही।
क्या आपका खून ऐसे राजा को देख खौलता नही?




