देशात धार्मिक वातावरण गढूळ व्हावे ही भाजपची इच्छा; सचिन सावंत यांचा आरोप

मुंबई : राज्यातील महाविकास सरकार अस्थिर करण्यासाठीच भाजपचा हा कुटील डाव असल्याचे काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. अमरावतीमध्ये घडलेल्या दंगलीवरुन सचिन सावंत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. देशात धार्मिक धार्मिक वातावरण गढूळ व्हावे ही भाजपची इच्छा असल्याचे सावंत म्हणाले. त्रिपुरामध्ये घडललेल्या घटनेवरुन महाराष्ट्रात दंगल हिंसा घडली आहे. भाजपकडून अमरावती बंदची हाक देण्यात आली होती परंतु या बंदचे हिंसेत रुपांतर झाले. काही दुकानांची तोडफोड करण्यात आली असून जमावाकडून दगडफेकही झाली आहे.
देशात धार्मिक विद्वेष पसरावा ही भाजपाची इच्छा आहे हे लक्षात ठेवा.
महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी अनेक कुटील डाव मायावी भाजपाने केले. आता राज्यात दंगास्त्र वापरत आहेत. भीमा कोरेगाव येथे हेच केलं गेलं!
पण अगोदर प्रमाणेच हे ही अस्त्र जनताच निष्प्रभ करेल.— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 13, 2021
काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत अमरावतीमध्ये घडलेल्या घटनेवरुन भाजपवर निशाणा साधला आहे. देशात धार्मिक विद्वेष पसरावा ही भाजपची इच्छा आहे हे लक्षात ठेवा असे सावंत म्हणाले. तसेच महाराष्ट्र विकास आघाडी सरकार अस्थिर करण्यासाठी अनेक कुटील डाव मायावी भाजपाने केले. आता राज्यात दंगास्त्र वापरत आहेत. भीमा कोरेगाव येथे हेच केलं गेलं असे सचिन सावंत यांनी सांगितलं आहे. पण अगोदर प्रमाणेच हे ही अस्त्र जनताच निष्प्रभ करेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
मोर्चे, दंगल सुनियोजीत षडयंत्र : देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्रातील मोर्चे आणि दंगल हे सुनियोजीत षडयंत्र असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्रिपुरामध्ये घटना झाल्यानंतर हिंसाचार उफाळला आहे पंरतु तिकडे हिंसाचार झालाच नाही असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केल आहे. तसेच सरकारी पक्षाचे नेते व्यासपीठावर जाऊन भडकवण्याचे भाष्य करत असतील तर या दंगलीची जबाबदारीही सरकारवर येईल. महाराष्ट्रात मोर्चा काढू नये आणि शांतता पाळावी असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.
फडणवीस यांनी अमरावतीमधील दंगलीवर प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, त्रिपुरामध्ये घटना झाल्यानंतर अशा प्रकराचा उद्रेक इथे होता कामा नये, तुम्ही इथली शांतात भंग करत असाल तर महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी असा सल्ला फडणवीसांनी दिला आहे. कारण अशा प्रकारे जातीय तणाव महाराष्ट्रात जर होणार असेल तर योग्य राहणार नाही. मग अशा प्रकारची प्रवृत्ती त्रिपुरात घटना घडतेय इथे दादागिरी कराल तर महाराष्ट्रात चालणार नाही, महाराष्ट्र सरकारने कारवाई करावी अन्यथा हाताबाहेर प्रकरण जाईल असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.
महाराष्ट्रातील मोर्चे आणि दंगली हे सुनियोजित षडयंत्र आहे. त्रिपुरामध्ये जी घटनाच घडली नाही त्या घटनेवर अशा प्रकारचे मोर्चे काढणे हे अत्यंत चुकीचे आहे. त्रिपुरा सरकारने आणि त्रिपुरा पोलिसांनी स्वतःजी मशीद जाळली म्हणून हे आंदोलन होत आहेत. त्या मशीदीचे फोटो देखील प्रसारित केले आहेत. हे सगळं सोशल मीडियावर पेटवण्याचा प्रयत्न कशा प्रकारे केला आहे. त्यांना अटक करण्यात आला आहे.
त्यामुळे कुठलीही मशीद त्रिपुरामध्ये जाळली गेली नाही असे असताना, त्या संबंधांच्या घटनांवर महाराष्ट्रात मोर्चे काढायचे आणि हिंदूंची दुकाने जाळायची हे योग्य नाही. सरकारने त्यावर कडक कारवाई केली पाहिजे. सरकारी पक्षाचे नेते व्यासपीठावर जाऊन भडकवण्याचे भाष्य करत असतील तर या दंगलीची जबाबदारी सरकारवर येणार आहे. त्यामुळे कोणीही महाराष्ट्रात दंगल करु नये आणि अशा प्रकारे मोर्चे काढून हिंदूंची दुकाने टार्गेट करु नये आणि शांतता पाळली पाहिजे असे आमचे मत असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.




