राजकारण

आसाममध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला; भाजप ९२ जागांवर लढणार

गुवाहाटी: आसामच्या विधानसभा निडणुकीचं बिगूल वाजताच भाजपने जागा वाटपाचा तिढाही सोडवला आहे. भाजपने मित्रपक्षांबरोबर जागा वाटपाचा फॉर्म्युला तयार केला आहे. त्यानुसार या निवडणुकीत भाजप, एजीपी आणि यूपीपीएल एकत्रित निवडणूक लढवणार आहेत. आसाम गण परिषद (अगप) 26, यूपीपीएल 8 तर भाजप 92 जागांवर लढणार आहे.

आसाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने गुरुवारी या फॉर्म्युल्याला अंतिम स्वरुप दिलं आहे. काल भाजप मुख्यालयात पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली होती. या बैठकील पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित होते. तर मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल हे भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी गेले होते. यावेळी आसामच्या निवडणुकीवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला मंत्री हिंमत बिस्वा सरमा, आसाम प्रभारी बैजयन्त पांडा आणि सह प्रभारी पवन शर्माही उपस्थित होते.

आसाम विधानसभेत एकूण 126 जागा आहे. 2016च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 60 जागांवर विजय मिळला होता. गेल्या निवडणुकीत बोडोलँड पीपल्स फ्रंटने (बीपीएफ) भाजप आणि अगपसोबत युती करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी बीपीएफने 12 जागा जिंकल्या होत्या. यावेळी बीपीएफने काँग्रेस आणि एआययूडीएफसोबत आघाडी केली आहे.

या निवडणुकीत भाजपला सत्ता राखण्याचं आव्हान असणार आहे. यावेळी भाजपचा थेट सामना काँग्रेस-एआययूडीएफ आघाडीशी होणार आहे. गेल्या दहा वर्षातील काँग्रेसच्या सत्तेला सुरुंग लावून भाजप गेल्यावेळी सत्तेत आली होती. त्यामुळे सत्ता राखण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे.

आसाममध्ये तीन टप्प्यात निवडणुका
आसाममध्ये तीन टप्प्यात निडणुका होतील. पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी मतदान होणार आहे. दुसऱ्याच टप्प्याचं मतदान 1 एप्रिल रोजी होणार आहे. तिसऱ्या टप्प्याचं मतदान 6 एप्रिल रोजी होणार आहे आणि 2 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button