राजकारण

मुक्ताईनगरमध्ये भाजपला हादरा, ७ नगसेवकांच्या हाती ‘शिवबंधन’

मुंबई : भाजपला जळगावमध्ये पुन्हा हादरा बसला आहे. मुक्ताईनगर नगरपालिकेच्या १० आजी-माजी नगरसेवकांनी मंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेनत प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या वर्षा निवासस्थानी या १० जणांनी हाती शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश केला आहे. यामध्ये ७ विद्यमान नगरसेवक आहेत तर ३ माजी नगरसेवक आहेत. यामुळे भाजपला मोठे खिंडार पडले आहे.

भाजपच्या विद्यमान नगरसेवकांनी पक्षाला सोडचिट्ठी देत रामराम केला आहे. या नगरसेवकांमध्ये मुक्ताईनगरचे पियुष महाजन, संतोष कोळी, मुकेश वानखेडे आणि इतर ४ नगरसेवकांचा समावेश आहे.

भाजपचे १० नगरसेवक शिवसेनेत गेल्याची बातमी चुकीची : एकनाथ खडसे

मुक्ताईनगर भाजपाचे १० नगरसेवक शिवसेनेत गेल्याची बातमी चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. अपात्रतेच्या भीतीपोटी पाच अपक्ष नगरसेवक शिवसेनेत गेल्याचं दिसतंय. बाकीचे नगरसेवक माझे समर्थक आहेत. त्यामुळे नगर परिषदेवर कुठलाही परिणाम याचा होणार नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button