राजकारण

भाजप आमदाराचा गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न

मुंबईः विधानसभेचे कामकाज सुरु झाल्यानंतर प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी उपस्थित केलेल्या प्रश्नाला नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी समाधान न झाल्याने भाजपाच्या आमदाराने विधानसभा गॅलरीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला. भाजपा आमदाराच्या या प्रयत्नामुळे संपूर्ण सभागृह हादरून गेले.
आर्णी नगरपरिषदेत झालेल्या गैरव्यवहारप्रकरणाशी संबधित असलेल्या लोकांवर कारवाई करण्याचा मुद्दा उपस्थित भाजपाचे आमदार संदीप धुर्वे यांनी प्रश्नोत्तराच्या तासा दरम्यान उपस्थित केला. त्यावर सदर लोकांवर कारवाई करण्याचे आश्वासन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मात्र या आश्वासन दिल्यानंतरही समाधान न झालेल्या भाजप आमदार संदीप धुर्वे यांनी निलंबित करण्याची मागणी करत चक्क आतील बाजूस असलेल्या गॅलरीच्या कठड्यावर येत माझे म्हणणे ऐकून घ्या नाही तर मी उडी मारतो असा इशारा देत कठड्यावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या प्रयत्नाने सभागृह चांगलेच हादरले.
सभागृहात आर्णी नगरपरिषदेचा तारांकित प्रश्न आमदार संदीप धुर्वे यांनी मांडला. यावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे आर्णी नगरपरिषदेतील प्रश्नावर उत्तर सुरू केले. त्याचवेळी दुसरीकडे संदीप धुर्वे यांनी माझे म्हणणे ऐकून घ्या, नाहीतर गॅलरीतून उडी मारेन, अशी धमकी दिली. ते उडी मारण्यासाठी सभागृह गॅलरीच्या कठड्यापर्यंत आले. यावेळी अन्य भाजप आमदारांनी त्यांना परावृत्त करायचे सोडून उलट धुर्वे यांना त्यासाठी प्रोत्साहनच दिले. यावेळी संतप्त झालेल्या उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी तुमच्या प्रतिनिधीला शांत करा अशा सूचना भाजप नेत्यांना दिल्या.

धुर्वे यांच्यावर कारवाई करा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ही सभागृहाची शिस्त आहे का, याला सभागृह म्हणतात का? काय चाललंय सभागृहात, असा सवाल करीत अशा आमदारांवर कारवाई का करा, अशी मागणी केली. त्याच वेळी संसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी सदस्य उडी मारण्याच्या प्रयत्न करताहेत. आत्महत्या करणं हा गुन्हा आहे. आपण कारवाई करणार का असा सवाल उपाध्यक्षांना केला. अखेर धुर्वे यांना स्पष्टीकरण करावे लागले. मी उडी मारणार नव्हतो. केवळ आर्णी नगर परिषदेच्या गैरव्यवहार प्रकरणी कारवाई करण्याची माझी मागणी होती. आपले लक्ष वेधण्यासाठी मी आवाज देत होतो, असे स्पष्टीकरण दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button