Top Newsराजकारण

‘महाराष्ट्र बंद’ हाणून पाडण्यासाठी भाजप नेत्यांचा आटापिटा

मुंबई : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी इथं शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्रात बंद पुकारण्यात आला आहे. महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी बंदमध्ये सहभाग घेतला. या बंदमध्ये लोकांचा स्वेच्छेन सहभाग घेतला आहे असा दावा मविआ नेते करत आहेत. तर आजचा बंद हा पूर्णपणे फसला आहे, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. दरम्यान, भाजपने संपूर्ण राज्यात आपल्या नेते आणि कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हा बंद यशस्वी होऊ नये म्हणून प्रचंड आटापिटा केल्याची चर्चा आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा पुन्हा एकदा महाराष्ट्र बंदमुळे उघड झाला आहे. राज्य सरकारला महाराष्ट्र बंद करण्याची नैतिकता आहे का? हा बंद म्हणजे सरकार स्पॉन्सर्ड दहशतवाद असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. फडणवीस यांनी महाराष्ट्र बंदवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या सरकारला महाराष्ट्र बंद करण्याची नैतिकता आहे का? असा खोचक सवाल देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला केला आहे. लखीमपुरच्या घटनेसाठी महाराष्ट्र बंद करण्यात येतो परंतु महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या पैशाची मदत करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात असल्याचेही फडणवीस यांनी म्हटलं आहे.

यांनी महाराष्ट्र बंदवरुन महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील सरकारला आंदोलन करण्याची नैतिकता आहे का? असा खोचक सवाल फडणवीस यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा असून आता ढोंगीपणा जगासमोर उघड झाला असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे. लखीमपुरच्या घटनेसाठी महाराष्ट्र बंद करण्यात येतो. परंतु राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नव्या पैशाची मदत करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी संकटात आहे. हे सरकार सत्तेत आल्यापासून २ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

महाविकास आघाडी सरकारने कर्जमाफीच्या घोषणा केल्या, नुकसानीची मदत करण्याच्या घोषणा केल्या त्या हवेत विरल्या आहेत. अजून शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तींवर मदत केली नाही. ज्या शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे ती, तोकडी पडली आहे. शेवटी एका घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी म्हटलं आहे की, पुर्वीच्या फडणवीस सरकारने चांगली मदत केली. आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस असल्याचे फडणवीस यांनी म्हटलं आहे.

गोळीबार करणाऱ्यांना आंदोलनाची नैतिकता आहे का?

या सरकारमध्ये तीच लोकं आहेत ज्या लोकांनी मावळला पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता. या गोळीबार करणाऱ्या सरकारला नैतिकता आहे का आंदोलन करण्याची असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

लखीपुर खीरीतील घटना दुर्दैवी आहे परंतु हा बंद संवेदना दाखवण्यासाठी नाही तर राजकीय पोळी भाजता येईल का या विचाराने केलेला हा बंद असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. या बंदला प्रतिसाद नाही मात्र प्रशासनाची मदत घेऊन, दमदाटी करुन पोलीस प्रशासन, जीएसटी प्रशासन या सगळ्याचा वापर करुन लोकांना बंद ठेवण्यासाटी प्रवृत्त केलं जात असल्याचे सांगत फडणवीसांनी महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे.

आंदोलन सरकार पुरस्कृत

ईस्टर्न एक्सप्रेसवेवर महाविकास आघाडी सरकारमधील १० कार्यकर्ते मार्ग रोखून धरतात. त्या रस्त्यावर टायर जाळून जाळपोळ करतात पोलीस प्रशासन तेथे उपस्थित आहेत. पंरतु पोलीस कारवाई करत नाही. एकूणच हे सरकार पुरस्कृत दहशतवाद सुरु असल्याचे दिसत आहे. असा घणाघात फडणवीस यांनी केला आहे.

बंद पूर्णपणे फसलेला आहे : चंद्रकांत पाटील

लखीमपुर खिरी येथील आंदोलनकारी शेतकऱ्यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. परंतु महाराष्ट्र बंद हा फसलेला आहे. आज जो काही बंद आहे तो केवळ भीतीने असल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. लखीमपुर खिरी प्रकरण दुर्दैवी आहे. त्याची चौकशी सुरु आहे. परंतु महाराष्ट्र बंदची हाक देणं हे न कळणारे असल्याचेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाणीव असेल तर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी असे वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना महाराष्ट्र बंदवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. लखीमपुरमध्ये घडलेल्या घटनेपासून भाजपच्या विरोधकांनी हा विषय प्रचंड लावून धरला आहे. घडलेली घटना दुर्दैवी आहे. परंतु त्या घटनेची कारवाई होऊ शकते. त्या घटनेचा भाजप, केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशमधील सरकारशी काय संबंध आहे. हे माहिती नाही. केंद्रीय मंत्र्यांच्या मुलावर शेतकऱ्यांवर गाडी चढवल्याचा आरोप आहे. त्याची चौकशी होईल, पोलिसांनी त्याला अटक केली आहे. परंतु महाराष्ट्र बंदची हाक देणं हे न कळणारे असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. आजचा महाराष्ट्र बंद हा पुर्णपणे फसलेला आहे. जो काही बंद आहे तो भीतीने पाळण्यात आला असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

कोल्हापुरमधील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी शिवसेनेला आवाहन केलं की शिवसेना स्टाईलने बंद करा. म्हणजे यांच्यामध्ये काहीच ताकद नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना वारंवार सांगत आहे की, हे तुमच्या जीवावर मोठे होत आहेत. यांच्याकडे लोकं नाहीत बंद करायला तेवढा धाकही नाही. शिवसेनेकडून बंद म्हटल्यावर लोकं घाबरतात असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

खुर्ची टिकवण्यासाठी शिवसेना ‘बंद’मध्ये सहभागी !

मंदिरे उघडली आहेत. नागरिक दर्शनासाठी बाहेर पडले आहेत. अनेक महिन्यांनी व्यवसाय सुरू आहेत. याचवेळी बंद करणं शिवसेनेला मान्य नव्हते. परंतू शरद पवारांनी सांगितल्यानंतर ‘खुर्ची’टिकवण्यासाठी शिवसेना बंदमध्ये सहभागी झाल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button