भाजप नेते कमालीचं खोटं बोलतात; राजेंद्र शिंगणेंचा संताप

मुंबईः कोरोनावरील उपचारासाठी प्रभावी ठरणाऱ्या रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यभरात तुटवडा निर्माण झाला आहे. तर, एकीकडे सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. रेमेडेसिवीर इंजेक्शन खरेदी करण्यासाठी अन्न व प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची परवानगी घेतल्याचा दावा भाजपनं केला होता. मात्र, शिंगणे यांनी भाजपचा दावा फेटाळून लावत या प्रकरणी महत्त्वाचा खुलासा केला आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा व साठा यावरुन उलट सुलट तर्क लावले जात आहेत. यावरुन भाजप माझ्या नावाचा अपप्रचार करत आहे. कोणताही पक्ष वैयक्तिकरित्या इंजेक्शनचा साठा खरेदी करु शकत नाही. त्यांना तो सरकारला द्यावा लागतो, असं शिंगणे यांनी म्हटलं आहे. ‘भाजप रेमडेसिवीरचा साठा विकत घेऊन मला देणार होते अशी उलट सुलट चर्चा समाज माध्यम व सोशल मीडियावर सुरु असून ते पूर्णपणे चुकीचे आहे,’ असं स्पष्टीकरण शिंगणे यांनी दिलं आहे.



