भाजप नेते, माजी मंत्री श्यामाप्रसाद मुखर्जींना १० कोटींच्या हेराफेरी प्रकरणी अटक
कोलकाता : माजी मंत्री आणि भाजप नेते श्यामाप्रसाद मुखर्जी यांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालच्या बाकुंडा जिल्ह्यातील विष्णूपूर मतदारसंघातून ते आमदार होते. १० कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. विधानसभा निवडणुकांपूर्वी ते तृणमूल काँग्रेस पक्षातून भाजपमध्ये गेले होते. मात्र, यंदा विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्कारावा लागला.
श्यामाप्रसाद मुखर्जी हे विष्णापूर नगरपालिकेचे चेअरमनही होते. विशेष म्हणजे तब्बल ३४ वर्षे ते या नगरपालिकेचे अध्यक्ष होते. या कालावधीत त्यांनी कामाचा ठेका देण्यासंदर्भात १० कोटी रुपयांची हेराफेरी केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली असून त्यांना 4 दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली आहे. बानकुराचे पोलीस अधीक्षक ध्रीतीमान सरकार यांनी याबाबत माहिती दिली आहे. दरम्यान, यापूर्वी शारदा चीट फंड घोटाळ्यातही त्यांचे नाव होते.