मुंबई : कृषिपंपाच्या थकीत वीजबिलामुळे सुरू असलेली वीज तोडणीची कारवाई तत्काळ थांबवावी, या मागणीसाठी विरोधकांनी सोमवारी विधानसभेत आक्रमक पवित्रा धारण केला. थकबाकीसह चालू बिल दाखवून वसुली सुरू आहे. बिले भरली नाहीत, तर कनेक्शन तोडली जातात, सरकार चालू वीजबिलात चालुगिरी करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केला.
वीज बिल वसुलीवर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे वचन पाळणार की नाही?
विरोधक सोडा, सभागृहातील कोणत्याही सदस्यांना विचारा.
शेतकऱ्यांच्या बाबतीत थोडे तर संवेदनशील व्हा.
वकिली उत्तरे नको.
चालू बिलाच्या नावाखाली चालुपणा करू नका.
(विधानसभा । मुंबई । दि. 7 मार्च 2022)#BJP #farmers pic.twitter.com/mDTIv0dmrd— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 7, 2022
विरोधकांच्या गोंधळामुळे सभागृहाचे कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आले. त्यानंतर, या गोंधळातच इतर कामकाज आटोपते घेत, नंतर सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले. आमदार कुणाल पाटील, नाना पटोले यांच्यासह इतर आमदारांनी लक्षवेधी मांडली होती. यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि राज्यमंत्री प्राजक्त तणपुरे यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवेदन करण्याचा आग्रह विरोधकांनी धरला. मात्र, विरोधकांची मागणी फेटाळून लावल्याने विरोधी पक्षातील आमदारांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
सूरज जाधवच्या आत्महत्येचे पडसाद
सूरज जाधव या शेतकऱ्याने फेसबुक लाईव्ह करीत आत्महत्या केली.
रोज आपण शेतकऱ्याची वीज कापतो.
तुम्ही दर अधिवेशनात घोषणा करता.
उपमुख्यमंत्री आदेश देतात आणि ऊर्जा मंत्री ऐकत नाही.
वीज तोडणी तत्काळ थांबवावी !
(विधानसभा । मुंबई । दि. 7 मार्च 2022)#SurajJadhav #farmersuicide #farmers pic.twitter.com/FCI21UXwU8— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 7, 2022
सोलापूर जिल्ह्यातील सूरज जाधव या तरुणाने फेसबुक लाइव्ह करत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेचे पडसाद विधानसभेत उमटले. वर्षभरात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, कनेक्शन तोडली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. दुसरा अर्थसंकल्प आला, तरीही काहीच होत नाही, असा आरोप सुधीर मुनगंटीवार यांनी केला. या कुटुंबाला तातडीने मदत मिळावी, अशी मागणी केली.
सरकारे येतील आणि जातील. पण पोलिस एकदा बेछूट झाले तर भविष्यात काहीच चांगले राहणार नाही.
रवी राणा हे दिल्लीत असताना त्यांच्यावर गुन्हा कसा?
(विधानसभा । मुंबई । दि. 7 मार्च 2022)https://t.co/sOWXfqPB4u#Maharashtra #BJP #BudgetSession #MaharashtraBudgetSession pic.twitter.com/7sOe4d04pz— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) March 7, 2022