नव्या वर्षात राज्यात भाजप सरकार : नारायण राणे
सावंतवाडी : महाराष्ट्रात नव्या वर्षात भाजपचे सरकार येईल या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या विधानाची रि ओढत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ते काहीतरी अंदाज घेऊनच बोलले असून बोलल खर होईल अशी पुष्टी जोडत तसे झाल्यास तुमच्या तोंडात साखर पडो असे राणे म्हणाले.
सावंतवाडीत भाजपच्या बैठकी नंतर सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, महिला जिल्हाध्यक्षा संध्या तेरसे, जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत, शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावले आदी उपस्थित होते.
रत्नागिरीत जिल्हा बँक निवडणुकीत झालेला पराभव हा धक्का आहे का असे विचारताच राणे यांनी आम्ही याला धक्का मानत नाही. मीच सर्वाना धक्के देत असल्याचे राणे यांनी सागितले.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत केंद्राने निर्देश द्यावेत
एसटीच्या संपाला भाजपचा पाठींबा आहे. मात्र सरकारने आता काय तो निर्णय घेतला पाहिजे. ४० आत्महत्या होईपर्यंत सरकार काय करत होते असा सवाल करत राणे म्हणाले एसटी कर्मचार्यांरी आंदोलना बाबत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असेही राणे म्हणाले.
महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत एसटीचा विषय येतो. एसटीचा एवढे दिवस संप सुरु आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या घरची परिस्थिती भयावह आहे. असं असताना राज्य सरकार हा प्रश्न खेळवतंय या प्रश्नाकडे दुर्लक्ष करतंय. त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हे सरकार गांभीर्याने घेत नाही. केंद्र सरकारने सरळ महाराष्ट्र सरकारला निर्देश द्यावेत. हा प्रश्न त्वरित मिटववा, अन्यथा राज्यपालांकडे आम्ही हे अधिकार देऊ वगैरे आदेश केंद्राने द्यावेत. मी स्वतः गृहमंत्री अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी बोलेन. यातून मार्ग लवकरच काढावा आणि कर्मचाऱ्यांना वाचवावं एवढ मी सांगेन, असं नारायण राणे म्हणाले. तसेच राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब यांच्याशीसुद्धा कर्मचाऱ्यांच्या हितासाठी बोलेन, असेदेखील त्यांनी सांगितले.
शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं त्यांचं काम
दरम्यान, नारायण राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. राणे म्हणाले की, शरद पवार तोडगा कधीच काढत नाहीत, खेळवत ठेवणं हेच त्यांचं काम आहे. ते एसटी कामगारांच्या संपावर तोडगा काढणार नाहीत.
पंतप्रधानाच्या निर्णयावर नो कमेंट्स
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदे मागे घेतले यावर विचारलेल्या प्रश्नावर राणे बोलण्यास नकार देत पंतप्रधानाच्या निर्णयावर मी बोलू शकत नाही असे सांगत नो कमेंट्स असे म्हणाले.