Top Newsराजकारण

भाजपच्या बड्या नेत्याचा आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार; ६ महिने लैंगिक शोषण

नवी दिल्ली : देशामध्ये महिलांवरील अत्याचाराच्या बलात्काराच्या आणि लैंगिक शोषणांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातही महिला अत्याचारावरून ठाकरे सरकारला कोंडीत पकडणाऱ्या भाजप नेत्यांना खाली मान घालावी लागत आहे. त्याचे कारण म्हणजे एक संतापजनक घटना समोर आली आहे. भाजपच्या एका बड्या नेत्याने आंतरराष्ट्रीय स्तरावरील महिला खेळाडूवर बलात्कार केल्याची भयंकर घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे सहा महिन्यांपासून महिलेचं लैंगिक शोषण सुरू होतं. याप्रकरणी पीडित तरुणीने पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर आरोपी असलेल्या भाजप नेत्याला अटक करण्यात आली आहे.

पीडित महिलेनं लावलेल्या आरोपात तथ्य असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालं असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संजय मिश्रा असं अटक केलेल्या आरोपीचं नाव असून तो भारतीय जनता पार्टीच्या पश्चिमी सिंहभूम मीडिया प्रभारी आहे. मंगळवारी चक्रधरपूरचे डीएसपी दिलीप खलको यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित महिलेची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर, आरोपी संजय मिश्राला अटक करण्यात आली आहे. डीएसपी दिलीप खलको यांनी पीडित तरुणीने लावलेल्या आरोपात तथ्य असल्याचं देखील म्हटलं आहे.

पीडित आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूचा अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याचा आरोप देखील खरा असल्याचं तपासात समोर आलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय मिश्रा एप्रिल महिन्यापासून पीडित तरुणीला ब्लॅकमेल करत होता. संजय मिश्रा याने पीडित महिला खेळाडूचा काही आक्षेपार्ह फोटो काढले होते आणि संबंधित फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत आरोपी पीडितेला एका स्थानिक हॉटेलमध्ये बोलावून तिचं लैंगिक शोषण करत होता.

अटक होण्यापूर्वी संजय मिश्रा यांनी एक व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये त्यांनी माझे विरोधक मला निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत पराभूत करू इच्छित आहेत. त्यामुळे त्यांनी एकजुटीने माझ्याविरोधात वातावरण निर्माण केलं आहे. माझ्यावर बलात्काराचा आरोप होणं हे विरोधकांनी रचलेलं घृणास्पद षडयंत्र आहे. माझा प्रशासनावर पूर्ण विश्वास आहे. पोलिसांनी दोघांचे कॉल डिटेल्स तपासावे. तसेच आरोपात ज्या हॉटेलचा उल्लेख करण्यात आला त्या हॉटेलातील ३ एप्रिलचे रजिस्टर तपासावे, तसेच सीसीटीव्ही पाहावे, असं देखील म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button