सत्तेची भूक शमविण्यासाठी भाजपकडून राणेंना मंत्रीपद : प्रियांका चतुर्वेदी
मुंबई – केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राणे यांच्याविरोधात शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राणेंना अटक करण्याची मागणी शिवसैनिकांनी केली आहे. नाशिकमध्ये याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी राणेंना अटकही केली. राणेंच्या अटकेनंतर पुन्हा भाजपा-शिवसेना वाद टोकाला गेला आहे. भाजपला सत्तेची भूक आणि लालच असल्यानेच राणेंनी केंद्रात एवढं मोठं स्थान दिल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.
भाजपाने काहीही करुन महाराष्ट्रात सरकार बनविण्याचा प्रयत्न केला. त्यातूनच, देवेंद्र फडणवीस काही तासांसाठी मुख्यमंत्री बनले होते. त्यामुळेच, महाराष्ट्रात लोकांमध्ये आक्रोश आहे, क्रोध आहे. दररोज तिसऱ्यादिवशी हे सांगण्यात येतंय की महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ होणार आहे. दर तीन दिवसांनी भाजप-शिवसेना सरकार बनविणार असल्याची अफवा पसरविण्यात येत आहे. भाजपला सत्तेची भूख आणि लालच आहे. त्यामुळेच, नारायण राणेंना प्रमुखपद देण्यात आलंय, अशी बोचरी टीका शिवसेनेच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी केली आहे. २०१९ पासून २०२१ पर्यंतचे त्यांचे वक्तव्य ऐकल्यास त्यांनी केवळ शिव्या दिल्या आहेत. चरित्रहनन आणि वैयक्तिक टीका टिपण्णी एवढंच केलंय. भाजपला मर्यादा नाही, संविधान आणि संवैधानिक पदाची मर्यादा भाजपा नेत्यांकडून राखली जात नाही. आपण सातत्याने मुख्यमंत्र्यांवर शिवसैनिकांवर टीका करत असाल, तर मर्यादा पाळणं केवळ सर्वसामान्य जनतेचंच काम नाही, असेही चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.