
चेन्नई : इंडिया सिमेंटच्या ७५व्या वर्षपूर्ती निमित्तानं चेन्नईत एका कार्यक्रमाचे आयोजन केले गेले होते. त्या कार्यक्रमात चेन्नई सुपर किंग्सच्या आयपीएल २०२१च्या जेतेपदाचा आनंदही साजरा केला गेला. चेन्नईच्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. यावेळी जय शाह यांनी आयपीएल २०२२ भारतातच होणार असल्याचे जाहीर केले.
इंडियन प्रीमिअर लीगच्या पुढील पर्वात १० संघ मैदानावर उतरणार आहेत. आरपी संजीव गोयंका आणि सीव्हीसी कॅपिटल यांनी अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली आहे. त्यामुळे आयपीएल २०२२चा थरार आणखी वाढणार आहे.
असे असतील नवे नियम :
आयपीएल २०११ मध्ये १० संघ खेळले होते आणि तोच फॉरमॅट २०२२ मध्येही असेल. दहा संघांची प्रत्येकी पाच-पाच अशा दोन गटांत विभागणी करण्यात येईल. गटातील प्रत्येक संघ एकमेकांशी दोन आणि दुसऱ्या गटातील संघाशी एक असे सामने खेळतील. साखळी फेरीत प्रत्येक संघ १४ सामने खेळतील. विजयी संघाला दोन गुण मिळतील, तर सामना अनिर्णीत राहिल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल.
प्ले ऑफचे चार सामने
क्वालिफायर १ – साखळी फेरीत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
एलिमिनेटर – तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
क्लालिफायर २ – क्वालिफायर १ मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटरमधील विजयी संघ
अंतिम सामना – क्वालिफायर १ विरुद्ध क्वालिफायर २




