Top Newsराजकारण

बसवराज बोम्मई कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री

बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांच्या जागेवर त्यांच्या मंत्रिमंडळातील गृहमंत्री बसवराज बोम्मई यांची मुख्यमंत्री म्हणून निवड करण्यात आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री आणि निरीक्षक धर्मेंद्र प्रधान यांनी ही घोषणा केली आहे. येडियुरप्पा यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.

बसवराज बोम्मई हे बी.एस. येडियुरप्पा यांच्यासारखेच ताकदवान लिंगायत नेते आहेत. ते येडियुरप्पा यांचे निकटवर्तीय मानले जातात. मात्र, येडियुरप्पा यांनी लिंगायत समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करु नये, असं म्हटलं होतं. बसवराज बोम्मई हे कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस आर बोम्मई यांचे पुत्र आहेत. बोम्मई यांनी जनता दलातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. येडियुरप्पा यांना राजीनामा द्यायला सांगितल्यानंतर भाजपचा हा लिंगायत समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री करुन संतुलन साधण्याचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे.

भाजपचे नेते आणि राज्याचे गृहमंत्री बसवराज बोम्मई हे सुद्धा मुख्यमंत्रीपदाचे दावेदार मानले जातात. गेल्या काही दिवसात बोम्मई यांनी नेत्यांच्या भेटीगाठीही सुरू केल्या होत्या. त्यांनी नुकतीच प्रल्हाद जोशी यांचीही भेट घेतली होती. त्यामुळे मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेत त्यांचंही नाव आलं होतं. मात्र, त्यावर बोलण्यास त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. बोम्मई यांनी सावध पवित्रा घेत काहीच प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button