दुबई : ग्रुप १ मधून इंग्लंडनं सलग चार विजयाची नोंद करून उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला आहे आणि आता दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात चढाओढ रंगणार आहे. मंगळवारी दक्षिण आफ्रिकेनं उपांत्य फेरीच्या दिशेनं दमदार पाऊल टाकताना बांगलादेचा डाव ८४ धावांवर गुंडाळला. कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी व अॅनरीज नॉर्ट्झे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली. आफ्रिकेचा संघ हा सामना सहज जिंकेल असे वाटत होते, परंतु बांगालदेशनं त्यांनाही धक्के दिलेच. दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघाने टी२० विश्वचषकाच्या ग्रुप १ मध्ये उत्तम कामगिरी करत बांग्लादेशला मात दिली आहे. या विजयासह ते गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी पोहोचले आहेत. ४ पैकी ३ सामने जिंकत त्यांनी ६ गुणांसह ते दुसऱ्या स्थानी विराजमान आहेत. ग्रुप १ मधून इंग्लंडनं सलग चार विजयाची नोंद करून उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला आहे आणि आता दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात चढाओढ रंगणार आहे.
प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला आधीच एक धक्का बसला होता. त्यांचा स्टार अष्टपैलू शाकिब अल हसन यानं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. त्याचा परिणाम फलंदाजांच्या कामगिरीवर जाणवला. बांगलादेशचा संघ कोसळला. लिटन दास ( २४) व महेदी हसन ( २७) हे बांगलादेशचे टॉप स्कोअरर ठरले. कागिसो रबाडानं २० धावांत ३ आणि नॉर्ट्जेनंही ८ धावांत ३ विकेट्स घेतल्या. शम्सीनं २१ धावांत २ आणि ड्वेन प्रेटोरीअसनं ११ धावांत १ विकेट घेतली.
प्रत्युत्तरात आफ्रिकेचे तीन फलंदाज ३३ धावांवर माघारी परतल्यानं सामन्यात थोडी चुरस निर्माण होताना दिसली. तस्कीन अहमदनं आफ्रिकेच्या रिझा हेंड्रीक्स ( ४) व एडन मार्कराम ( ०) यांना बाद केलं. क्विंटन डी कॉक १६ धावा करून महेदी हसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. रॅसी व्हॅन डेर ड्युसेन व कर्णधार टेम्बा बवुमा यांनी खिंड लढवताना आफ्रिकेला विजय मिळवून दिला. ड्युसेन २२ धावांवर बाद झाला. बवुमा ३१ धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेनं ६ विकेट्स व ३९ चेंडू राखून विजय मिळवला. आफ्रिकेनं या विजयासह ४ सामन्यांत ३ विजय मिळवून सहा गुणांसह ग्रुप १ मधील दुसऱ्या क्रमांकावरील पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाचे ३ सामन्यांत ४ गुण आहेत.