बाबुल सुप्रियोंनी निर्णय बदलला; खासदारकी सोडणार नाही !
नवी दिल्ली : माजी केंद्रीय मंत्री आणि पश्चिम बंगालचे मोठे नाव असलेले भाजपचे खासदार बाबुल सुप्रियो यांनी राजकारणाला रामराम करण्याची घोषणा केली होती. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्यांनी मी राजकारणात केवळ समाज सेवेसाठी आलो होतो. आता मी माझा मार्ग बदलण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हणत राजकारणाबरोबरच खासदारकीही सोडण्याची घोषणा त्यांनी केली. मात्र, आज भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपला निर्णय बदलला आहे.
लोकांच्या सेवेसाठी राजकारणात राहण्याची गरज नाही. राजकारणापासून वेगळे होऊनही ते हे करू शकतात. परंती मी पूर्वीपासून भाजपत होतो आणि भाजपतच असेन. माझा हा निर्णय त्यांना समेजल असे म्हणत त्यांनी राजीनाम्याचे कारण गुलदस्त्यात ठेवले होते. मात्र, आता राजीनामा न देता खासदारकी कायम ठेवण्याच्या निर्मयावर त्यांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे, बाबुल सुप्रियो हे राजकारणात नसतील पण खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण करतील.
बाबुल हे पश्चिम बंगालच्या आसनसोल लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे, आसनसोल येथील नागरिकांनी दिलेल्या जबाबदारीचे कर्तव्यनिष्ठेने पालन करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. मी कुठल्याही पक्षाच्या सक्रीय राजकारणात असणार नाही. तसेच, मला खासदार म्हणून दिल्लीत मिळालेला बंगलाही मी खाली करणार आहे. तसेच, माझ्या सुरक्षा रक्षकांनाही लवकरच माझ्यापासून नोकरीमुक्त करणार असल्याचे सुप्रियो यांनी सांगितलं.
बाबुल सुप्रियोंनी फसवले; राजीनाम्यानंतर दत्तक गावच्या रहिवाशांचे मुंडन
दोन दिवसांपूर्वी माजी केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी राजकारणातून सन्यास घेत असल्याची तसेच खासदारकीचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. समाजाची सेवा करण्यासाठी राजकारणात राहण्याची गरज नाही, असे त्यांनी म्हटले होते. तसेच भाजपाच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यांनी दत्तक घेतलेल्या गावानेच त्यांना हातचा आरसा दाखविला आहे.
एकीकडे भाजपाकडूनबाबुल सुप्रियो यांना समजाविण्याचे प्रयत्न सुरु आहेत. दुसरीकडे त्यांनी दत्तक घेतलेल्या गावच्या रहिवाशांनी मुंडन करण्यास सुरुवात केली आहे. पश्चिम बर्दवान जिल्ह्य़ातील सालानपूर ब्लॉकमध्ये देंदुआ पंचायतीच्या सिद्धबाडी गाव बाबुल सुप्रियो यांनी मोदींच्या घोषणेनुसार दत्तक घेतले होते. सुप्रियो यांनी सोलार लाईट, रस्ते आणि सबमर्सिबल पंपासह अनेक गोष्टी करण्याचे आश्वासन दिले होते. या गोष्टी सोडता अन्य काहीच त्यांनी केले नसल्याचा आरोप गाववाल्यांनी केला आहे. आम्ही राजकारणाचे शिकार झालो, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. काही ग्रामस्थांनी सांगितले की, बाबुल सुप्रियो यांनी या गावात एक हॉस्पिटल, एक मोठी शाळा बनविण्याची घोषणा केली होती. मात्र, दोनदा खासदार झाले तरीदेखील काहीच केले नाही, पुढेही काही होणार नाही.
सिद्धबाडी गावातील रहिवासी अमर मंडल आणि विनोद दास यांनी सोमवारी सकाळी आपले मुंडन केले. बाबुल यांनी जी आश्वासने दिलेली ती आजवर पूर्ण केली नाहीत. त्यांनी गावाला वडिलांसारखे मांडीवर घेतलेले, आता त्यांच्या जाण्यामुळे गाव अनाथ झाले. यामुळे आम्ही मुंडन करून आपले दु:ख व्यक्त केले आहे.