फोकस

सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील यांना लाच घेताना अटक

मुंबई : सहाय्यक पोलीस आयुक्त सुजाता पाटील लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकल्या आहेत. सुजाता पाटील यांना एसीबीकडून अटक करण्यात आली आहे. एक लाख रुपयांची लाच घेताना सुजाता पाटील यांना रंगेहाथ पकडले आहे.

सध्या सुजाता पाटील यांच्याकडे मेघवाडी आणि जोगेश्वरी पोलीस स्टेशनचा चार्ज आहे. काही दिवसांपूर्वी सुजाता यांनी एका प्रकरणासाठी एक लाखाची मागणी केली होती. याचा पहिला हफ्ता ४० हजार रुपये घेताना सुजाता पाटील यांना रंगेहात एसीबीकडून अटक केली आहे. यापूर्वी सुजाता पाटील यांच्याकडे हिंगोलीच्या पोलीस उपअधीक्षकपदाची जबाबदारी होती. तसेच सुजाता पाटील यांनी हिंगोलीत बदली न झाल्यामुळे तत्कालीन मुख्यमंत्र्यांना नाराजीचे पत्र लिहून आत्महत्या आणि राजीनामा हे दोनच पर्याय असल्याची खंत व्यक्त केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button