फोकस

पैशाने भरलेल्या ४ गाड्या आणि हेलिकॉप्टर घेऊन अशरफ घनी यांचे पलायन

काबुल : तालिबानच्या भीतीने अफगाणिस्तानातून पळून गेलेले राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी रोख रकमेने भरलेल्या चार कार आणि हेलिकॉप्टरसह काबूलला रवाना झाले होते. रॉयटर्सने रशियन वृत्तसंस्था आरआयए आणि काही प्रत्यक्षदर्शींचा हवाला देत म्हटले आहे की, अशरफ घनी यांना सर्व पैसे सोबत घेऊ जाता आले नाहीत म्हणून त्यांना काही पैसे मागे ठेवावे लागले. काबुलमधील रशियन दूतावासाच्या प्रवक्त्या निकिता इंश्चेन्को यांनी सांगितले की, चार कार रोख रकमेने भरलेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी काही रक्कम हेलिकॉप्टरमध्ये ठेवली. यानंतरही, ते सर्व पैसे ठेवू शकले नाहीत आणि काही पैसे असेच सोडले. रशियन दूतावासाच्या प्रवक्त्याने सांगितले की, प्रत्यक्षदर्शीकडून ही माहिती मिळाली.

तालिबानी अतिरेकी गटाला रोखण्यासाठी अमेरिका आणि नाटो फौजा अफगाणिस्तानातून परत गेल्यानंतर सक्रिय झालेल्या तालिबानी बंडखोरांनी अवघ्या आठवडाभरातच जवळजवळ संपूर्ण अफगाणिस्तानवर ताबा मिळवला आहे. तालिबानने रविवारी राजधानी काबूलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांनी देशाबाहेर पलायन केलं. अशरफ घनी ताजिकिस्तानला रवाना झाले होते. मात्र त्यांचे विमान तेथे उतरण्यास परवानगी मिळाली नाही. त्यामुळे अशरफ घनी आता अमेरिकेत जाऊ शकतात. सध्या ते ओमान येथे आहेत.

सध्या अशफ घनी हे ओमानला असल्याचा दावा केला जात आहे. त्यांना ताजिकिस्तान आणि कझाकिस्तानने त्यांच्या देशात येऊ दिले नाही. ते ओमानमार्गे अमेरिकेला जाण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. अफगाणिस्तान सोडण्याआधीच अशरफ घनी यांनी फेसबुकवरील एका पोस्टमध्ये ते देशातील रक्तपात थांबवण्यासाठी देश सोडून जात असल्याचे म्हटले होते. जर मी इथे राहिलो तर माझे समर्थकही रस्त्यावर उतरतील आणि तालिबानच्या हिंसक वृत्तीमुळे रक्तपात होईल असे घनी यांनी म्हटले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button