Top Newsराजकारण

‘सामना’चे नाव बदलून ‘पाकिस्तान नामा’ किंवा ‘बाबरनामा’ करा : शेलार

मुंबई : शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’मधील आपल्या रोखठोक सदरात केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले. यावरून भाजपने टीका केली असून, सामनाचे आता नाव बदलून आता पाकिस्तान नामा किंवा बाबरनामा करावे, असे म्हटले आहे.

महाविकास आघाडीची स्थापना झाल्यापासून शिवसेना आणि भाजप यांच्यात अनेकविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक तीव्र होईल, असे सांगितले जात आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सामनातील रोखठोक सदरात फाळणीचा दिवस विसरु नका, असे पंतप्रधान मोदींचे फर्मान आहे. देशाचे विभाजन म्हणजे अराजकच होते. पाकिस्तान निर्मितीचे गुन्हेगार हे फक्त महात्मा गांधींना ठरवून नथुराम गोडसेंनी गांधींवर गोळ्या झाडल्या. गांधींना मारण्यापेक्षा बॅ. जीनांवर हा प्रयोग झाला असता तर फाळणीचा स्मृतीदिन साजरा करण्याची वेळ आली नसती, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. याला भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर देत टीकास्त्र सोडले आहे.

संजय राऊत यांनी कितीही प्रयत्न केला तरी, या देशाचा वेगळा इतिहास लिहिण्याच्या काँग्रेसच्या प्रयत्नांना त्यांनी बळ देण्याचा हा प्रयत्न आहे. जीना यांनी फाळणी केली याबद्दल दुमत असण्याचे कारणच नाही. गोळीबार, हल्ला किंवा खून गाधीजींचा याचे कुणी समर्थन करण्याचा विषयच नाही. संजय राऊत, विपर्यासाचे विच्छेदन करून सत्याला लपवता येत नाही. भारतीय लोकांच्या फाळणीच्या आठवणींना एक अर्थाने इतिहासातून धडा घेऊन, नवा इतिहास घडवण्यासाठीचा तो दिवस पंतप्रधान मोदींनी घोषित केला तर, पाकिस्तानच्या पोटात दुखायला लागले. त्याच पद्धतीच्या भावना संजय राऊत रुपी संपादकाच्या हातून सामनात उतरायला लागल्या. त्यामुळे सामनाने आता नाव बदलून टाकावे, सामनाने त्याचे नाव पाकिस्तान नामा किंवा बाबरनामा करावे, असा खोचक टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button