Top Newsराजकारण

गोव्यात भाजप उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच ३ बड्या नेत्यांचे बंड !

पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात. भाजपने एकूण ३४ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. मात्र, भाजपनं आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केल्यानंतर आता भाजपमध्ये मोठी बंडखोरी पाहायला मिळतेय. कारण, गोव्यातील भाजपचे तीन बडे नेते उमेदवारी न मिळाल्यानंतर आता अपक्ष म्हणून दंड थोपटणार असल्याचं कळतंय.

भाजपने गोव्यात ३४ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केलीय. त्यानंतर आता माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे मोठे नेते लक्ष्मीकांत पार्सेकर हे अपक्ष निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळतेय. ते मांद्रे विधानसभा मतदारसंघातून ते अपक्ष म्हणून दंड थोपटणार आहेत. मांद्रेत विद्यमान आमदार दयानंद सोपटे यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. या जागेवर लक्ष्मीकांत पार्सेकरही इच्छुक होते. तर सांगे मतदारसंघातून सावित्री कवळेकर या अपक्ष निवडणूक लढणार आहेत. सावित्री कवळेकर या उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांच्या पत्नी आहेत. भाजपनं चंद्रकांत कवळेकरांना केपे मतदारसंघातून उमेदवारी घोषित केली आहे.

गोवा भाजपमध्ये अजून एक बंड पाहायला मिळत आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सावर्डे विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक प्रभुपाऊस्कर अपक्ष निवडणूक लढणार आहेत. भाजपने उमेदवारी नाकारल्यानं त्यांनी हा निर्णय घेतलाय. भाजपने सावर्डे मतदारसंघात गणेश गावकर यांना उमेदवारी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button