अनुराग कश्यप, तापसी पन्नूच्या घरावर आयकर विभागाची छापेमारी
मुंबई : बॉलिवूड लोकप्रिय दिग्दर्शक अनुराग कश्यप, विकास बहल आणि अभिनेत्री तापसी पन्नूच्या घरावर आणि मालमत्तांवर आयकर विभागाने छापा टाकला आहे. माहितीनुसार, फँटम फिल्म्स संदर्भात ही छापेमारी असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे फँटम संबधित ठिकाणावर छापेमारी केली आहे. पुणे, मुंबईसह २२ ठिकाणी आयकर विभागाकडून छापेमारी केली आहे. माहितीनुसार, या लोकांनी मोठ्या प्रमाणात कर चुकवल्याचा आरोप आहे. अजूनही आयकर विभागाची छापेमारी सुरू आहे. त्यामुळे छापेमारीच्या क्रमवारीत आणखी मोठी नावे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
केंद्रीय यंत्रणेला अनुराग कश्यप, विकास बेहेल आणि तापसी पन्नूवर मोठ्या प्रमाणात भर नसल्याचा संशय आहे. त्यामुळे अनुराग, विकास आणि तापसी संबंधित मुंबई आणि मुंबई बाहेरील ठिकाणांवर आयकर विभाग धाड टाकल आहे. अनुराग, विकास, तापसी यांच्यासह अनेक बड्या कलाकारांच्या मालमत्तेवर छापा टाकण्यात आला आहे. माहितीनुसार ही छापेमारी फँटम फिल्म्सने केलेल्या करचोरी प्रकरणात सुरू आहे. फँटम फिल्म्सचे संस्थापक अनुराग, विकास आणि मधू मंटेना यांच्याकडे आहे. अनुरागकडे फँटम फिल्म्सची मालिकी आहे.
फँटम फिल्म्स ही अनुराग, दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवणे, निर्माण मधू मंटेना आणि यूव्हीव्ही स्पॉटबॉयचे माजी प्रमुख विकास बहल यांनी स्थापन केलेली एक चित्रपट निर्मिती आणि वितरण कंपनी आहे. २०१० साली फँटम फिल्म्सची स्थापना करण्यात आली. बॉलिवूडचे अनेक सुपरहिट चित्रपट फँटम फिल्म्सच्या निर्मितीखाली झाले. ‘सुपर ३०’, ‘क्वीन’, ‘ उडता पंजाब’, ‘मसान’ यांसारख्या अनेक चित्रपटाची निर्मिती फँटम फिल्म्सने केली आहे.