Top Newsराजकारण

परमबीर सिंगांविरोधात आणखी एक अजामीनपात्र वॉरंट

मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने कोर्टात अर्ज केला होता यानंतर आता किला कोर्टाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. यापुर्वी ठाणे कोर्टाकडूनही अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. यामुळे परबीर सिंग यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात खंडणीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. परमबीर सिंग यांच्यासह दोघांविरोधात अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आले आहे. सिंग यांचा शोध घेण्याचा राज्य सरकार आणि महराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस प्रयत्न करत आहेत. परंतु परमबीर सिंग यांच्याशी अद्याप संपर्क झाला नाही.

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. सिंग यांच्यासोबत विनय सिंह, रियाझ भाटीविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी करण्यात आले आहे. आतापर्यंत मुंबई, ठाण्यामध्ये गुन्हा दाखल कऱण्यात आला आहे. खंडणीप्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. परमबीर सिंग यांना अटक करण्याचे वॉरंट ठाणे कोर्टाकडूनही जारी करण्यात आले आहे. त्याबाबतची नोटीस परमबीर सिंग यांच्या घराबाहेर लावण्यात आली आहे.

परमबीर सिंह यांच्याविरोधात अटकेसाठी वॉरंट जारी करण्यात आले असून कायद्याने कलमांतर्गत ३८४, ३८६, ३८७, ३८९, ३९२, ३२४, ३२३, ५०६, ५०६(२), १६६, १०९, १२०बी भारतीय दंड संहिता कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही महिन्यांपूर्वी ठाणे पोलिसांकडून परमबीर सिंग यांच्याविरोधात लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले आहे.

परमबीर सिंग यांनी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये खंडणी गोळा करण्याचे आदेश दिले असल्याचा आरोप केला आहे. यानंतर परमबीर सिंग यांच्याविरोधात ठाणे आणि मुंबई येथे खंडणी प्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत. खंडणी मागण्यासाठी धमकावल्याचे आरोप परमबीर सिंग यांच्यावर करण्यात आले होते. यामध्ये ठाण्यात एकूण २९ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे देण्यात आला होता. गुन्हे शाखेने किला कोर्टात धाव घेतली होती अखेर किला कोर्टाकडून परमबीर सिंग यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button