Top Newsराजकारण

अजितदादांना आणखी एक धक्का; मामेभावाच्या पुण्यातील घरी ईडीची छापेमारी

पुणे: अजित पवारांचे मामेभाऊ जगदीश कदम यांच्या पुण्यातील घरी ईडीने छापा टाकला आहे. जगदीश कदम हे पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर्स या खाजगी साखर कारखान्याचे चेअरमन आहेत. त्याचबरोबर जलसंपदा खात्यांमधील काही कंत्राटांचाही त्यांच्याशी संबंध आहे. पुण्यातील सिंध कॉलनीतील घरी ईडीने छापा टाकून कारवाई केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित पुणे जिल्ह्यातील दौंड शुगर या खासगी साखर कारखान्यावर आयकर विभागाने ७ ऑक्टोबरला सकाळी सहा वाजता छापे मारी केली होती. सुमारे १४ वर्षांपूर्वी दौंड सहकारी हा दौंड तालुक्यातील आलेगावमधील साखर कारखाना विकत घेत त्याचे खासगीकरण करण्यात आले आहे. अजित पवार यांचे नातलग असलेले नगर जिल्ह्यातील जगदीश कदम कारखान्याचे अध्यक्ष आहेत. माजी आमदार बाळासाहेब जगदाळे यांचे पुत्र व जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे व मुंबईतील बडे प्रस्थ असलेले विवेक जाधव हे या कारखान्याचे संचालक आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button