अनिल देशमुखांच्या खुलाश्याने फडणवीस, मुनगंटीवार यांच्या आरोपातील ‘हवा गुल्ल’
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी 15 ते 27 फेब्रुवारीपर्यंत गृहमंत्री अनिल देशमुख होम क्वॉरंटाईन होते, असा दावा केला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी हा दावा खोडून काढताना देशमुख क्वॉरंटाईन होते तर त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी सुरक्षारक्षकांच्या लवाजम्यात पत्रकार परिषद कशी घेतली? असा सवाल केला होता. मात्र अनिल देशमुख यांनी तत्काळ प्रसिद्धी माध्यमांसमोर येत भाजप नेत्यांची पोलखोल केल्यामुळे भाजपचा खोटारडेपणा उघड झाल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
शरद पवारांच्या दिल्लीतील पत्रकार परिषदेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी थेट 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुख यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचा एक व्हिडीओच ट्विट केला. देशमुख यांनीच हा व्हिडीओ ट्विट केला होता. 15 ते 27 फेब्रुवारी या कालावधीत अनिल देशमुख होम क्वारंटाईन होते, असे पवार साहेब सांगतात. पण, 15 ला सुरक्षारक्षकांसह, समोर माध्यमप्रतिनिधी अशी पत्रपरिषद मात्र झाली होती. हे नेमके कोण?, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे. यातून फडणवीस यांना परमबीर सिंग यांनी केलेला दावा खरा असल्याचं म्हटलं आहे.
अनिल देशमुख यांनी फडणवीसांच्या आरोपांवर म्हटले आहे की , मी नागपूरच्या रुग्णालयात 5 ते 15 फेब्रुवारी दरम्यान अॅडमिट होतो. मला कोरोना झाला होता. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर घरी जात असताना मला काही पत्रकार भेटले. त्यांनी मला सेलिब्रिटजवरील वादावर काही प्रश्न केले. तेव्हा माझ्या अंगात ताप नव्हता. पण अंगात त्राण होता. मला थकवा आलेला होता. त्यामुळे रुग्णालयाच्या गेटवरच पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. त्यानंतर मी थेट गाडीत बसून घरी गेलो आणि होम आयसोलेशनमध्ये गेलो. त्यानंतर २८ फेब्रुवारीला मी सह्याद्री गेस्ट हाऊसला पहिल्यांदा आलो, असं देशमुख यांनी म्हटलं आहे. देशमुख यांनी या खुलाश्यातून विरोधकांच्या विरोधातील हवाच काढून टाकली आहे.
परमबीर सिंग यांनी फेब्रुवारीच्या मध्यात वसुलीच्या सूचना देण्यात आल्याचे सांगितले होते. माझ्याकडे कागदपत्र आहेत. त्यावरून 5 ते 15 फेब्रुवारीपर्यंत अनील देशमुख हे कोरोनामुळे रुग्णालयात भरती होते. मी रुग्णालयातूनही ही माहिती घेतली आहे. देशमुख हॉस्पीटलमध्ये भरती असल्याचा रेकॉर्ड आहे आणि 15 ते 27 फेब्रुवारी पर्यंत होम कॉरेन्टाईन चा सल्ला डॉक्टरांचा होता. असं असताना सिंग कशाच्या आधारावर देशमुखांनी वाझेंना भेटून वसुलीचे आदेश दिल्याचं सिंग सांगत आहेत, असा सवाल शरद पवारांनी केला आहे.