राजकारण
स्वतःचा बचाव करण्यासाठीच परमबीर सिंगांचे खोटे आरोप; अनिल देशमुखांनी आरोप फेटाळले

मुंबई: होमगार्डचे प्रमुख परमबीर सिंग यांनी टाकलेल्या लेटर बॉम्बनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सिंग यांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. वाझेप्रकरणी होणाऱ्या कायदेशीर कारवाईपासून वाचण्यासाठी सिंग यांनी खोटे आरोप केले आहेत, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.
अनिल देशमुख यांनी ट्विट करून परमबीर सिंग यांचे सर्व आरोप फेटाळले आहेत. मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असताना व त्याचे धागेदोरे तत्कालीन पोलिस आयुक्त परमबिर सिंग यांच्यापर्यंत पोहोचणार असल्याची शक्यता तपासातून होत असताना परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला आहे, असा दावा अनिल देशमुख यांनी केला आहे.