मनोरंजनमहिला

‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’; अमृता फडणवीसांचं नवीन गाणं व्हायरल

मुंबई – माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सोशल मीडियात नेहमीच चर्चेत असतात. आपल्या गाण्यांसाठी त्या लोकप्रिय आहेत. ‘कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…’ हे अमृता फडणवीसांचं नवीन गाणं लवकरच प्रदर्शित होणार आहे. ८ मार्च रोजी महिला दिनी हे गाणं प्रदर्शित होणार आहे. अमृता फडणवीस यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत माहिती दिली आहे. तसेच काही फोटो देखील पोस्ट केले आहेत.

“जेव्हा ती संघर्षपथावर निघाली तेव्हा तिला – कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…. तिने मात्र जगाला दाखवून दिले की तिच्या प्रगतीचा प्रवाह रोखणे शक्य नाही! ‘स्त्री शक्ती‘ला गौरवान्वित करणारे माझे नवीन गीत नक्की पाहा, 8 मार्च रोजी, जागतिक महिला दिनी!” असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. यासोबतच त्यांनी InternationalWomensDay हा हॅशटॅग देखील वापरला आहे. काही दिवसांपूर्वी अमृता यांनी आठ मार्चला आपलं नवीन गाणं रिलीज होणार असल्याची माहिती दिली होती. ट्रोलर्सना तयार राहण्याचाही इशाराही त्यांनी त्यावेळी दिला होता.

व्हॅलेंटाईन डे निमित्त अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज झालं होतं. ट्विटरवरून अमृता फडणवीसांनी हे गाणं शेअर केलं होतं. ‘ये नयन डरे डरे’ असं या नवीन गाण्याचं नाव होतं.

‘झी म्यूझिक मराठी’च्या आगामी ‘अंधार’ या सस्पेन्स थ्रीलर चित्रपटासाठी अमृता फडणवीस यांनी गाणं गायलं आहे. ”डाव मांडते भीती”, असे गाण्याचं शिर्षक असून गाण्याच्या व्हिडिओमध्ये गुन्हेगारी थ्रीलर घटना दाखवल्या आहेत. अमृता फडणवीस देखील या गाण्याच्या व्हिडिओत दिसून येत आहेत. Jazz पढडीतील या गाण्यात अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजासह मनमोहक अदांनी व्हिडिओला रेट्रो लूक देण्याचा प्रयत्न केला आहे.

अमृता फडणवीस याआधी त्यांच्या ‘तिला जगू द्या’, या गाण्यामुळे चर्चेत आल्या होत्या. या गाण्यावरुन अमृता फडणवीसांना अनेकांनी ट्रोल देखील केलं होतं. त्यावर अमृता फडणवीसांनी “मी नेहमी ट्रोलर्सचं स्वागतच करते, त्यांच्यामुळे मी काही गाणं थांबवणार नाही. माझं आणखी एक गाणं लवकरच येणार आहे”, असं म्हटलं होतं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button