Top Newsराजकारण

अमरुल्लाह सालेह अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती; तालिबान विरोधात युद्धाची तयारी

काबुल : अफगाणिस्तानमध्ये तालिबानने ताबा घेतल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोक आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडण्यासाठी धावपळ करत आहेत. दुसरीकडे अफगाणिस्तानचे उपराष्ट्रपती अमरुल्लाह सालेह यांनी तालीबान समोर झुकण्यास नकार दिला आहे. अमरुल्लाह सालेह यांनी स्वत:ला काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून घोषित केले आहे. या मुद्द्यावर अमेरिकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा करणे व्यर्थ असून अफगाणी नागिरकांनी आपली लढाई स्वत: लढावी लागणार आहे, असे सालेह म्हणाले.

सालेह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, अफगाणिस्तानच्या नियमानुसार राष्ट्रपती वारले, पळून गेले तर उपराष्ट्रपतींना राष्ट्रपती म्हणून घोषित करण्यात येते. सध्या मी आपल्या देशाचा काळजीवाहू राष्ट्रपती आहे. सध्या मी सगळ्या मंत्र्यांना त्यांच्या समर्थन आणि पाठिंब्यासाठी संपर्क करत आहे. आता अफगाणिस्तानच्या विषयावर अमेरिकेच्या राष्ट्रपतींशी चर्चा करणे व्यर्थ आहे. आता अफगाणिस्तानच्या नागरिकांना ही लढाई स्वत: लढावी लागणार आहे. आता विरोध करण्यात काही उपयोग नाही. आता लढाईमध्ये सहभागी व्हा.

अफगाणिस्तानवर आता तालिबानने संपूर्ण नियंत्रण प्रस्थापित केलं असून राष्ट्रपती अशरफ घनी हे देश सोडून गेले होते. तर दुसरीकडे सालेह पंजशीक घाटीमध्ये गेले होते. सालेह यांनी या अगोदर देखील तालिबानच्या विरुद्ध आवाज उठवला होता. रविवारी जेव्हा काबुलसह संपूर्ण अफगाणिस्तान जेव्हा तालिबान्यांच्या नियंत्रणात गेले तेव्हा देखील सालेह यांनी आपली भूमिका मांडली. सालेह म्हणाले होते की, मी कधीच कोणत्याही परिस्थितीत तालिबानच्या दहशतवाद्यांसमोर झुकणार नाही. मी लाखो नागरिकांचा विश्वास तोडणार नाही, ज्यांनी माझे ऐकले. मी तालिबानसोबत कधीच राहणार नाही.

बिघडलेल्या परिस्थितीमुळे अफगाणिस्तानमध्ये आता अनागोंदी माजली आहे. त्या पार्श्वभूमीवर जगभरातल्या ६० हून अधिक देशांनी आपल्या देशातील नागरिकांची सुखरुपपणे सुटका करावी अशी विनंती तालिबानकडे केली आहे. काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देश सोडून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या किमान सात जणांचा मृत्यू झाल्याची बातमी आहे. तालिबानच्या प्रश्नावर आज युरोपियन युनियनची आज महत्वाची बैठक असून या प्रश्नावर काय भूमिका घ्यायची यावर चर्चा होणार आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि सचिव ब्लिन्केन यांनी अमेरिकन सैन्याच्या माघारीचे समर्थन केलं आहे. संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अ‍ॅन्टोनिया गुटेरस यांनी अफगाणिस्तानमधील परिस्थितीवर बोलताना तालिबानने हिंसाचाराचा मार्ग सोडावा असं आवाहन केलं होतं. महिला आणि बालकांचे अधिकार आणि सुरक्षा यावर त्यांनी विशेष चिंता व्यक्त केली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button